Mumbai Police Sakal
देश

Seema Haidar : "सीमा हैदर परत आली नाही तर भारताचा नाश... 26/11 प्रमाणे..."; मुंबई पोलिसांना धमकी

दत्ता लवांडे

मुंबई : मुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोलला आणखी एक धमकी वजा मेसेज आला आहे. त्यामुळे पुन्हा खळबळ उडाली असून मुंबई पोलिस हे सायबर पोलिसांच्या मदतीने या प्रकणाचा तपास करत आहे. अज्ञात व्यक्तीने नशेतून किंवा खोडसाळ पणे हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.

मेसेज करणाऱ्या व्यक्तीने, "सीमा हैदर ही परत आली नाही तर भारताचा नाश... 26/11 प्रमाणे परत येण्यासाठी स्वत:ला तयार करा. या करिता उत्तरप्रदेश सरकार जबाबदार राहील" अशा प्रकारचा मेसेज केला आहे. या मेसेजनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, सीमा हैदर ही महिला आपल्या मुलांना घेऊन नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली आहे. ती उत्तरप्रदेशमधील नोएडा येथील सचिन नावाच्या तरूणाच्या प्रेमात पडली होती. ती आपल्या नवऱ्याला सोडून भारतात आल्यानंतर पाकिस्तानकडून तिच्या या निर्णयाचा विरोध होत असून अनेक भारतीय नागरिकांकडून तिच्या कृतीला समर्थन देण्यात येत आहे.

सीमा हैदर या महिलेला परत पाठवण्यात यावे अशी मागणी पाकिस्तानातील तिच्या नवऱ्याकडून करण्यात येत आहे. तर अवैधरित्या रस्ता मार्गाने तिने भारतात प्रवेश केल्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

याआधीसुद्धा मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला अनेकदा धमकीचे फोन आल्याची घटना घडली आहे. "26/11 सारखा हल्ला पुन्हा करू, मुंबईत 1993 सारखा बॉम्बस्फोट करू, सीएसएमटी स्थानकावर बॉम्ब आहे" अशी धमकीसुद्धा मुंबई पोलीस कंट्रोल रूमला अनेकदा मिळाली आहे.

पण या धमक्या मनोरूग्ण किंवा एखाद्या नशेतील व्यक्तीकडून देण्यात आल्या होत्या. तर पुणे पोलिसांनासुद्धा रेल्वे स्टेशनवर बॉम्ब असल्याचा फोन अनेकदा मनोरूग्णाने केल्याच्या घटना घडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT