sehmat Indian female spy story esakal
देश

Indian Spy : पाक सैनिकाशी लग्न अन् बनली १९७१ च्या विजयामागचं गुप्त शस्त्र, भारताच्या 'या' महिला गुप्तहेराची स्टोरी माहितीये?

Indian female spy story : १९७१ च्या युद्धात पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याशी लग्न करून भारतासाठी गुप्त माहिती मिळवणाऱ्या महिला गुप्तहेराची धाडसी कहाणी जाणून घ्या.

Saisimran Ghashi

Indian spy story : ती एक साधी विद्यार्थीनी होती, शास्त्रीय नृत्य व व्हायोलिन शिकणारी, पण वडिलांच्या शेवटच्या इच्छेसाठी तिने आयुष्यच बदलून टाकलं. पाकिस्तानात जाऊन एका लष्करी अधिकाऱ्याशी विवाह केला, त्याच्या घरात राहिली, त्याच्या घरच्यांचा विश्वास संपादन केला आणि हे सगळं केवळ एकाच उद्देशाने भारतासाठी गुप्त माहिती मिळवण्यासाठी. ही स्टोरी आहे ‘सहमत’ या भारतीय महिला गुप्तहेराची जिने १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्वाची भूमिका बजावली.

वडिलांची देशभक्ती

जम्मू-काश्मीरची सहमत दिल्ली विद्यापीठात शिकत असतानाच तिच्या वडिलांनी तिला अचानक घरी बोलावलं. स्वतः 'रॉ'मध्ये कार्यरत असलेले वडील आजारपणामुळे शेवटच्या टप्प्यावर होते आणि देशसेवेची जबाबदारी त्यांनी आपल्या मुलीवर सोपवली. वडिलांच्या भावना आणि देशभक्तीपुढे सहमत झुकली आणि एका धाडसी मिशनसाठी पाकिस्तानात जाण्याची तयारी दर्शवली.

शत्रूच्या घरात राहून, देशासाठी लढा

सहमतचं लग्न पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्याशी करण्यात आलं. इक्बाल सय्यद नावाच्या या अधिकाऱ्याच्या माध्यमातून सहमतला पाकिस्तानी लष्करातील हालचालींची माहिती मिळू लागली. ती मोर्स कोडद्वारे भारतात संदेश पाठवत असे. संगीत आणि नृत्यकलेमुळे तिने सैन्य अधिकाऱ्यांच्या मुलांचं मन जिंकलं, त्यामुळे तिचा वावर लष्कराच्या वर्तुळात वाढू लागला.

PNS गाझी

सहमतकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर भारताने पाकिस्तानच्या PNS गाझी पाणबुडीचा ठाव घेतला आणि विशाखापट्टणमच्या किनाऱ्यावर तिचं निर्दालन केलं. ही घटना १९७१ च्या युद्धात एक मोठा रणनितीक विजय ठरली. युद्धाचा पवित्रा भारताच्या बाजूने झुकण्यास सहमतच्या माहितीचा मोठा वाटा होता.

मिशन जवळजवळ पूर्ण झाल्यानंतर सहमतवर संशय घेणारा अब्दुलला तिने गाडीने चिरडून मारले. इक्बालला सत्य समजताच त्याचाही मृत्यू झाला. सहमत गर्भवती होती आणि या अवस्थेतच ती भारतात परतली. तिने उर्वरित आयुष्य गुप्ततेत, पंजाबमधील मालेरकोटला येथे शांतपणे व्यतीत केलं.

मुलगा झाला लष्करी अधिकारी

सहमतच्या पहिल्या प्रेमाला तिचं सत्य समजल्यावरही त्याने तिच्या मुलाला आपला मुलगा मानून वाढवलं. तोच मुलगा पुढे भारतीय लष्करात अधिकारी झाला. सहमतच्या निधनानंतरही तिची ओळख अनेक वर्षं गुप्त ठेवण्यात आली. देशासाठी दिलेल्या त्यागामुळे, आणि तिच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी.

ही आहे एका वीर स्त्रीची कथा. जिच्या गुप्त युद्धाने अनेकांचे प्राण वाचवले आणि भारताला विजयाच्या दिशेने नेले. सहमतसारख्या महिला गुप्तहेरांचे योगदान नेहमीच अज्ञात राहते, पण त्यांच्या कार्याची जाणीव मात्र सर्वांनी ठेवायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai News : गेवराईच्या नदीकाठावरील त्या पूरग्रस्तांना चिखलातच दसरा साजरा करण्याची आली वेळ; चिखलाच्या खचाने साफसफाई करण्यासाठी कमी पडला अवधी

Thane News: खबरदार! टिळा आणि बांगड्या घालून याल तर...; खासगी शाळेचा विद्यार्थ्यांसाठी अजब फतवा

Latest Marathi News Live Update : दर वाढीमुळे ग्राहकांची सराफा बाजाराकडे पाठ

US Dollars to INR : जर अमेरिकेतून तुम्ही एक लाख डॉलर आणले, तर भारतात तुमच्या खात्यात एकूण रक्कम...!

Dussehra Melava 2025 Live Update: ठाकरेंच्या मेळाव्याला शिवसैनिकांची गर्दी

SCROLL FOR NEXT