Amit-Shah 
देश

पुराच्या नुकसानीचा अंदाज पाठवा - अमित शहा

सकाळ वृत्तसेवा

पणजी - महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत पुरामुळे झालेल्या नुकसानीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज चिंता व्यक्त केली. तसेच राज्य सरकारांनी नुकसानीचा तातडीने अंदाज घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, असे शहा यांनी आवाहन केले. 

पश्‍चिम विभागीय परिषदेच्या २४ व्या बैठकीचे आज येथे शहा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला गोवा, महाराष्ट्र, गुजरात राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासकीय प्रमुख आणि दीव-दमण आणि दादरा-नगर हवेलीचे केंद्र तसेच राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आजच्या बैठकीत गेल्या वर्षी गुजरात येथे झालेल्या २३ व्या बैठकीत मांडण्यात आलेले मुद्दे आणि त्यावरील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यात महाराष्ट्र सरकारच्या झोपडपट्टी पुनवर्सन योजनेचा बृहद्‍ आराखडा, बँकिंग सुविधेपासून वंचित असलेल्या गावांमध्ये बँकांच्या शाखा उघडणे, थेट लाभार्थी योजनेशी संबंधित पोर्टलच्या माध्यमातून माहितीचे संकलन, मच्छीमारांना क्यूआर कोड प्रणालीचे ओळखपत्र आणि पोस्को कायद्यातील तरतुदींविषयी तपशीलवार चर्चा करण्यात आली. या सर्व बाबींवर संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांनी दर महिन्याला आढावा बैठक घेण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: विकेंडला मुंबईकरांचे हाल होणार! तिन्ही लोकल मार्गांवर मेगाब्लॉक, वेळापत्रकात मोठे बदल

Japanese AI Company: जपानची AI कंपनी भारतातील या राज्यात करणार मोठी गुंतवणुक, कृषी क्षेत्रात करणार प्रोटीन क्रांती!

Bhaucha Dhakka : "मस्तीत नाय शिस्तीत राहायचं" रितेश ओरडताना हसणाऱ्या विशाल-अनुश्रीची मोडली खोड

Republic Day Parade: रस्त्यावरील भिकारी ते प्रजासत्ताक दिनाचे VIP पाहुणे! ‘SMILE’ योजनेनं घडवले चमत्कार..

कुटुंबासाठी तंबाखुच्या ४० कोटींच्या जाहिरातीला नकार, सुनील शेट्टी म्हणाला, पैशांची गरज होती पण...

SCROLL FOR NEXT