Coronavirus JN-1  esakal
देश

भारतावर पुन्हा कोरोनाचं संकट! 'या' राज्यात कोरोनानं घेतला एकाचा बळी; गोव्यात 18 तर महाराष्ट्रात किती रुग्ण?

कोरोनाचा ‘जेएन -१’ (Coronavirus JN-1) हा विषाणूचा प्रकार अतिशय वेगाने पसरत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मृताच्या कुटुंबातील एकूण पाच सदस्यांची कोविड चाचणी करण्यात आली आहे.

बंगळूर : कोरोनाचा ‘जेएन -१’ (Coronavirus JN-1) हा विषाणूचा प्रकार अतिशय वेगाने पसरत आहे. राज्यामध्ये पाच दिवसांपूर्वी एका ६४ वर्षीय व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव (Health Minister Dinesh Gundurao) यांनी सांगितले.

बंगळूरच्या चामराजपेट येथे राहणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकाला कोरोनासोबत इतर आजारही होते. त्याला टीबी, उच्च रक्तदाबासह फुफ्फुसाचा त्रास होता. दरम्यान, त्याची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, अवघ्या पाच दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

मृताच्या कुटुंबातील एकूण पाच सदस्यांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. पाचहीजण निगेटिव्ह आले आहेत. ते पाचजण क्वारंटाईनमध्ये आहेत. मृत व्यक्तीच्या अहवालाची वाट पाहात आहोत.

ते म्हणाले की, देशात एकूण २० संसर्गाची प्रकरणे आढळून आली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मुनसुख मांडविया यांनी घेतलेल्या सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये गुंडूराव सहभागी झाले होते. बैठकीनंतर मंत्र्यांनी आज विकास सौध येथे पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, गोव्यात १८, महाराष्ट्रात १ आणि केरळमध्ये १ रुग्ण आढळून आला आहे.

सल्लागार समितीची आज बैठक

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज (ता. २१) कोविडवर बंगळूरमध्ये तांत्रिक सल्लागार समितीची बैठक घेणार आहेत. त्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होणार असल्याचे मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले. केरळ सीमेवरील चार जिल्ह्यांमध्ये अधिक कोविड चाचण्या केल्या जाणार आहेत. चाचणी कीट, मास्क, औषध वितरणाची तयारी केली आहे. सध्या सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये आरटी-ईसीआर चाचणी मोफत आहे. राज्यात दररोज पाच हजार चाचण्या करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी! नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस गाड्या २६ जानेवारीपासून हडपसरवरून सुटणार, पहा नवीन वेळापत्रक

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला मिळाली द्रविडची रिप्लेसमेंट! जडेजाला संघात घेतल्यानंतर जाहीर केला मोठा निर्णय

Latest Marathi Breaking News : बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT