Senior Congress leader Subodh Kant Sahay said that Narendra Modi would die like Hitler Senior Congress leader Subodh Kant Sahay said that Narendra Modi would die like Hitler
देश

काँग्रेस नेत्याची जीभ घसरली; सहाय म्हणाले, मोदी हिटलरप्रमाणे मरतील

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेवरून देशात चांगलाच वाद सुरू आहे. सरकारविरुद्ध मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. ही योजना मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. मात्र, सरकार आपल्या निर्णयावर कायम आहे. दुसरीकडे या योजनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. ‘मोदी हिटलरच्या वाटेवर चालले तर हिटलरप्रमाणे मरतील’ असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते सुबोध कांत सहाय यांनी केले. (Subodh Kant Sahay said that Narendra Modi would die like Hitler)

काँग्रेस (Congress) नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी केंद्रीय मंत्री सहाय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली. काँग्रेस नेत्याच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मजीद मेमन म्हणाले की, प्रत्येक राजकीय नेत्याने केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. कारण, ते त्यांचे मत आहे.

भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी वापरलेल्या भाषेवर काँग्रेसने टीका किंवा निषेध न केल्याने काँग्रेसवर टीका केली. सोनिया गांधी व राहुल गांधीच अशा नेत्यांवर लगाम घालतील. कारण, त्यांनीच अशी विधाने करण्यास हिरवा सिग्नल दिला आहे, असेही ते म्हणाले. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते रमण सिंह यांनीही सहाय यांच्या वक्तव्याला गांधी कुटुंबीयांचे समर्थन असल्याचे म्हटले आहे.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप (BJP) नेते रघुबर दास यांनी सहाय यांच्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. कारवाईमुळे काँग्रेस गोंधळलेली आणि घाबरली आहे. त्यामुळेच पक्षाचे जुने नेते अशी निंदनीय विधाने करीत आहेत, असे ते म्हणाले.

नागपुरातूनही करण्यात आले होते असेच वक्तव्य

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नागपूरचे माजी अध्यक्ष शेख हुसेन यांनीही पंतप्रधानांवर असेच वक्तव्य केले होते. ‘जैसे कुत्ते की मौत होती है वैसे नरेंद्र मोदी की मौत होगी’ असे ते म्हणाले होते. नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राहुल गांधी यांची चौकशी केल्याने याचा निषेध करताना ते असे म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT