Senior Journalist Dilip Thakur  निकीता जंंगले
देश

“जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे, तोपर्यंत लता मंगेशकर यांचा आवाज कायम राहणार”

दिलीप ठाकूर यांनी ‘सकाळ’शी बोलताना लतादीदींबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

निकिता जंगले

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे मुंबईत आज निधन झाले. त्यांच्या निधनानं संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सिने पत्रकार दिलीप ठाकूर यांनी लतादीदींच्या आठवणींना उजाळा दिला. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लता मंगेशकर यांचा आवाज कायम राहणार अशा शब्दात दिलीप ठाकूर यांनी ‘सकाळ’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

दिलीप ठाकूर म्हणतात, “लता मंगेशकर यांच्यामध्ये गायिका आणि पार्श्वगायिका याचा सुंदर मिलाप होता आणि त्यांच्या आवाजाने त्यांनी कित्येक पिढ्या मंत्रमुग्ध केल्या.लतादीदींना एकीकडे आवाजाची दैवी देणगी होती तरीसुद्धा या देणगीवर अवलंबून न राहता उर्दूचे शिक्षण त्यांनी घेतले, यावरून त्यांची शिकण्याची प्रवृत्ती आपल्याला दिसली.”

लतादीदींच्या इतर वैशिष्ट्यांबाबत बोलताना दिलीप ठाकूर म्हणाले, “लतादीदींच्या गायनाच्या बरोबर त्यांचे इतर वैशिष्ट्य आहे जे त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळख करून देते. लतादीदींना लोकांशी संवाद साधायला आवडायचं. वातावरण एकदम कुल कसं ठेवणं, हसतखेळत लोकांशी सहजतेने संवाद साधणे हे लतादीदींना खूप जमायचं. नव्या पिढीशी जुळवून घेण्याचे त्यांचं वैशिष्ट्य आपण ट्वीटरच्या माध्यमातून पाहले. त्या नेहमी शुभेच्छा, जयंती, पुण्यतिथी निमित्त सतत ट्वीट करायच्या.”

सिने पत्रकारिता करीत असताना लतादीदींच्या भेटींचा दोनदा योग आल्याचे दिलीप ठाकूर यांनी सांगितले. लतादीदींच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. "विदेशातील भारतीय एवढेच नाही तर कालांतराने विदेशातील लोकांना सुद्धा लतादीदींच्या आवाजाची मोहिनी पडली आणि लतादीदींनी जगभर एक वेगळी ओळख निर्माण केली. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लता मंगेशकर यांचा आवाज कायम राहणार" अशा भावना व्यक्त करत दिलीप ठाकूर यांनी लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Paithan News : केकत जळगावमध्ये ग्रामस्थांची सतर्कता कामी आली; महावितरण तार चोरीचा प्रयत्न फसला!

Jalgaon News : थंडीचा कडाका अन् मेथीच्या लाडूंचा तडका! जळगावात घराघरांत दरवळला पारंपरिक स्वाद

IPL 2026 Auction: CSK ने प्रशांत वीरवर १४ कोटी का लावले? २० वर्षीय खेळाडूकडे असं काय आहे खास? वाचाल तर खूश व्हाल

SCROLL FOR NEXT