serum institute, adar poonawalla, pm modi  
देश

सीरमच्या CEO नीं मानले PM मोदींचे आभार; देशात पहिली लस देण्याचा व्यक्त केला विश्वास

सकाळ ऑनलाइन टीम

सध्याच्या घडीला देशात सीरमची लस पहिल्यांदा येणार की फायझर इंडियाची अशी चर्चा रंगत आहे. या चर्चेदरम्यान  पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड-अ‍ॅझेन्काच्या कोरोना लशीच्या आपातकालीन वापराला अधिकृत मान्यतेसाठी अर्ज केला.  त्यानंतर आता कंपनीचे सीईओ अदर पुनावाला यांनी केलेले एक ट्विट चर्चेत आले आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची COVISHIELD लसच पहिल्यांदा उपलब्ध होईल, असा विश्वास पुनावाला यांनी व्यक्त केलाय. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे.  

अदर पुनावाला यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, वचन दिल्याप्रमाणे कंपनीने 2020 पूर्वीच लशीच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभारही मानले आहेत. सीरमच्या COVISHIELD लशीशिवाय  भारत बायोटेक कंपनीच्या Covaxin आणि रशियाच्या  Sputnik V या लशीलाही एप्रिलमध्ये मंजूरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   

यापूर्वी फायझर इंडियाने ((Pfizer India) आपल्या लशीच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. सीरमच्या COVISHIELD लशीचे ट्रायल भारतात घेण्यात आले आहे. दुसरीकडे फायझरच्या चाचण्या झालेल्या नाहीत. याशिवाय फायझरच्या लशीचा साठा करुन ठेवणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे सीरमची लसच भारतात पहिल्यांदा उपलब्ध होण्याची शक्यता अधिक आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड-अ‍ॅझेन्कासोबत मिळून 100 कोटी डोस तयार करणार आहे.

देशातील अन्य बातम्यांसाठी येथे क्लिक करा

कंपनीने यूकेमध्ये झालेल्या ट्रायल डेटाच्या आधारावर भारतात लशीच्या वापराची परवानगी मिळावी, यासाठी अर्ज केलाय. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (डीजीसीआय) नव्या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. जुलै 2021 पर्यंत  30 कोटी भारतीयांना लस मिळेल, असे नियोजन केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. सीरमकडून सरकारला अधिक डोस मिळू शकतील, असेही बोलले जात आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT