Covid_20Poonawala
Covid_20Poonawala 
देश

कोविशिल्ड लशीचे एका स्वयंसेवकावर दुष्परिणाम? सीरमने केला खुलासा

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली- चेन्नईतील एका व्यक्तीने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविड-19 ची प्रायोगिक लस घेतल्यानंतर शरीरावर दुष्परिणाम (acute neuro encephalopathy) झाल्याचा दावा केला होता. तसेच सीरम इन्स्टिट्यूटला कायदेशीर नोटीस पाठवत 5 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. यानंतर कंपनीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

नोटीसमध्ये करण्यात आलेले आरोप चुकीचे आणि वाईट हेतूने प्रेरित आहेत. लशीची चाचणी आणि स्वयंसेवकामध्ये दिसून आलेली वैद्यकीय अवस्था यात काहीही संबंध नाही. स्वयंसेवक खोटे आरोप करत असून आपल्या वैद्यकीय स्थितीसाठी  जाणूनबुजून कोविशिल्ड कोविड-19 लशीला कारणीभूत ठरवत आहे. स्वयंसेवकामध्ये दिसून येत असलेले दुष्परिणाम  कोरोना लशीच्या डोसमुळे होणाऱ्या दुष्परिणामांपेक्षा पूर्णपणे भिन्न असल्याचे वैद्यकीय टीमने त्याला कळवलं होते. तरीही त्याने लोकांमध्ये जाऊन कंपनीची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयन्त केला, असं कंपनीने म्हटलं आहे. 

एक-एक करुन इराणच्या शास्त्रज्ञांना संपवण्यामागे कोणाचा हात? जाणून घ्या

स्वंयसेवकाचे हे कृत्य खास उद्धेशाने करण्यात आले असून कंपनीची बदनामी करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. सिरम इन्स्टिट्यूट अशा आरोपांना फेटाळून लावते, असेही कंपनीने म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका 40 वर्षीय व्यक्तीने 1 ऑक्टोबर रोजी कोविशिल्ड लस घेतली होती. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. व्यक्तीने सीरम इन्स्टिट्यूटला नोटीस पाठवली असून त्याला झालेल्या सर्व त्रासाची नुकसान भरपाई करण्याचा उल्लेख त्यात केला आहे. 

सीरम इन्स्टिट्यूटशीवाय भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद Indian Council of Medical Research (ICMR), ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया Drug Controller General of India (DCGI), अस्ट्राझेनकाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच लशीचे उत्पादन आणि वितरण तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली होती.  

दरम्यान, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि फार्मा कंपनी अस्ट्राझेनका कोविशील्ड लस तयार करत आहे. सीरम इन्स्टिट्यूटने अस्ट्राझेनकाशी करार केला असून त्याअंतर्गत पुण्यामध्ये या लशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने तिसऱ्या टप्प्यात कोविशिल्ड लस प्रभावी ठरल्याचे जाहीर केले होते. तसेच सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दोन आठवड्यांमध्ये लशीच्या मंजूरी मिळवण्यासाठी अर्ज करणार असल्याचे म्हटलं होते.  लस आपातकालिन वापरासाठी लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT