Accident News esakal
देश

Jaipur Accident News : ट्रक-मोटारीच्या अपघातात सात जणांचा होरपळून मृत्यू; दोन मुलांसह तीन महिलांचा समावेश

मोटारीतून प्रवास करणारे सर्व जण उत्तर प्रदेशातील मीरतचे राहणारे होते.

सकाळ वृत्तसेवा


जयपूर, ता. १४ (पीटीआय) ः सीकर जिल्ह्यामध्ये एक मोटार आणि ट्रक यांची धडक झाल्याने लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यात दोन मुलांचा आणि तीन महिलांचा समावेश आहे.

मोटारीतून प्रवास करणारे सर्व जण उत्तर प्रदेशातील मीरतचे राहणारे होते. ते हिसारहून सालासार बालाजी मंदिर येथे चालले होते. ‘‘आशीर्वाद पुलियाजवळ भरधाव मोटारीने चालत्या ट्रकला मागील बाजूने धडक दिली. त्यानंतर मोटारीला आग लागली. आग येवढी भीषण होती की कुणालाच मोटारीतून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही व साज जण त्यात होरपळून मृत्युमुखी पडले,’’ अशी माहिती फतेहपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक रामप्रताप बिष्णोई यांनी दिली.
आग लागल्यामुळे मोटारीतील प्रवाशांना दारेच उघडता आली नाहीत. यासर्वांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT