देश

JCB ने सामुहिकरित्या पुरले मृतदेह, बिहारमधील भयावह परिस्थिती

नामदेव कुंभार

देशातील काही राज्यात कोरोना संसर्गाचं (coronavirus india) प्रमाण कमी झाल्याचं समोर येत असतानाच बिहारमधील भयावह परिस्थिती समोर आली आहे. बिहारमध्ये (Bihar) मृतदेहला गाढण्यासाठी जेसीबीनं खड्डे खोदत आहेत. बिहारमधील बक्सर येथील चौसा महादेव घाटावर डजनभरपेक्षा जास्त रुग्ण आढळलेत. हे मृतदेह बिहारमधूनच (Bihar) नदीत टाकण्यात आले होते की उत्तर प्रदेशमधून याबाबतची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जिल्हाधिकारी अमन समीर यांनी सँपल घेऊन सम्मानपूर्वक डिस्पोज करणार असल्याचं सांगितलं. पण दुसरीकडे महादेव घाट (Mahadev Ghat) येथे सर्व मृतदेहाव पोस्टमार्टम न करता एकाच खड्ड्यात पुरण्यात आलेत. या धक्कादयक घटनेचं भयावह छायाचित्र समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं. या व्हिडिओवरुन जिल्हा प्रशासनानं सैरभर उत्तरे देण्यास सुरुवात केली. चौसा बीडीओ अशोक कुमार म्हणाले की, विविध ठिकाणाहून जवळपास - ते 45 मृतदेह वाहून महादेव घाट वर आले होते. (several dead body found at the banks of ganga river in buxar)

बीडीओ अशोक कुमार (Ashok kumar )यांनी हे सर्व मृतदेह बिहारमधील नसल्याचं म्हटलं आहे. हे सर्व मृतदेह उत्तर प्रदेशमधून वाहून आल्याचा दावा त्यांनी केलाय. उत्तर प्रदेशमधून (uttar pradesh) मृतदेह वाहून येथे येण्याचं थांबवण्याचा कोणताही पर्याय नाही. महादेव घाटावर चौकीदार नियुक्त करण्यात आला आहे. तो या मृतदेहाची विल्हेवाट लावत आल्याचेही त्यांनी सांगितलं. चौसा BDO आणि इतर स्थानिक आधिकाऱ्यांच्या देखरेखीत सर्व मृतदेह सामुहिकरित्या पुरले जात आहेत. त्यासाठी JCB नं मोठा खड्डा खोदला जातो. जिल्हाधिकाऱ्यानं पोस्टमार्टम आणि सम्मानपूर्वक अंत्यसंस्काराबाबत सांगितलं. पण असे काही होत नसल्याचं फोटो आणि व्हिडिओवरुन स्पष्ट झालं आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्यानं आज तक या वृत्तवाहिनीला सांगितलं की, आतापर्यंत 40 मृतदेह पुरले आहेत. आणखी तितकेच मृतदेह पडलेले आहेत.

स्थानिक रहिवाशी नरेंद्र कुमार मौर्य यानं आज तक या वृत्तवाहिनीला बोलताना सांगितलं की, चौसा घाटची परिस्थिती खूपच भयावह आहे. कोरोनामुले येथे दररोज 100 ते 200 लोक येतात. तसेच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडं नसल्यामुळे गंगा नदीत सोडून देतात. यामुळे कोरोनाची भिती आणखी वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT