Dhirendra Shastri vs Shankaracharya Swami  esakal
देश

चमत्कारानं जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा, मग आम्हीही नमस्कार करू; शंकराचार्यांचं थेट चॅलेंज

एकीकडं हिंदू संघटना बागेश्वर बाबाच्या समर्थनार्थ मैदानात उतरत असताना शंकराचार्यांनी मात्र बागेश्वर बाबाला आव्हान दिलंय.

सकाळ डिजिटल टीम

जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा, मग चमत्कार खरे मानू असं ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी आव्हान दिलंय.

गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये जोशीमठ (Joshimath Sinking) शहराच्या वाईट अवस्थेमुळं अनेकांच्या चिंतेत भर पडली आहे. एक संपूर्ण शहर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्यामुळं निसर्गावर आघात केल्यास तो कशा प्रकारे उत्तर देतो याचीच प्रतीची अनेकांना येत आहे.

उत्तराखंडमधील जोशीमठ (Uttarakhand Joshimath) इथं जमीन खचण्याच्या घटनेनं सरकारपासून साधू-महंतांपर्यंत सर्वच जण चिंतेत आहेत. या नैसर्गिक आपत्तीसमोर प्रत्येकजण पूर्णपणे असहाय्य दिसत आहे. त्याचवेळी बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे कथित चमत्कार आजही देशभरात चर्चेचा विषय बनत आहेत. काही लोक त्यांचं समर्थन करत आहेत, तर काही लोक चमत्काराच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. आता ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati) यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या चमत्कारांना आव्हान दिलंय.

यामुळं बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र शास्त्री आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं बागेश्वर बाबाला आव्हान दिल्यावर आता हिंदू संघटनांनी आंदोलनाची हाक दिलीय. दिल्लीत रोहिणीमध्ये हिंदुत्ववादी संघटना सकाळी 11 वाजता आंदोलन करणार आहेत. तर, एकीकडं हिंदू संघटना बागेश्वर बाबाच्या समर्थनार्थ मैदानात उतरत असताना शंकराचार्यांनी मात्र बागेश्वर बाबाला आव्हान दिलंय.

जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा, मग चमत्कार खरे मानू असं ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी आव्हान दिलंय. छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती दाखल झालेत. चमत्कार दाखवणाऱ्यांनी आधी जोशीमठला यावं आणि भूस्खलन थांबवून दाखवावं, तसं केल्यास मग आम्ही त्यांचा जयजयकार करु, त्यांना वंदन करु असं शंकराचार्यांनी म्हटलंय.

चमत्कार करत असाल तर धर्मांतरण थांबवून दाखवा, आत्महत्या थांबवा, शांतता प्रस्थापित करा, तुमचे चमत्कार जनतेच्या भल्यासाठी वापरा तर नमस्कार करू, नाहीतर तुम्ही कपट करत आहात असं मानू असं शंकराचार्यांनी सुनावलंय. यावेळी शंकराचार्यांनीही हात चलाकी करणाऱ्यांवरही निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारताचा सलग तिसरा विजय! आधी अभिज्ञान कुंडूने द्विशतक करत चोपलं अन् मग दीपेशने ५ विकेट्स घेत मलेशियाचा उडवला धुव्वा

SSC And HSC Board Exam: महत्त्वाची बातमी! डिजिटल मार्कशीटसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांना 'APAAR ID' नोंदणी करणं बंधनकारक

Palghar Bribery Case : नवापूरचा ग्रामसेवक लाच घेताना अटकेत; कृषी पर्यटन परवान्यासाठी २० हजारांची मागणी!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान पंचवीस दिवसांपासून रस्त्यावरच

Buldhana Accident : लेकीनं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण अपघाताने होत्याचं नव्हतं केलं; आई-बाबांना करावे लागले अंत्यसंस्कार...

SCROLL FOR NEXT