Swami Avimukteshwarananda 
देश

Video: अशा खोटारड्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे; 'हिंसक हिंदू' वक्तव्याप्रकरणी शंकराचार्यांचे राहुल गांधींना समर्थन

Swami Avimukteshwarananda On Rahul Gandhi Speech: उत्तराखंडच्या ज्योतीर मठाचे ४६ वे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरनंदा यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी १८ व्या लोकसभेमध्ये हिंदुत्वाबाबत भाष्य केले होते. यावरून सत्ताधारी पक्षाकडून मोठा वाद निर्माण करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर उत्तराखंडच्या ज्योतीर मठाचे ४६ वे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरनंदा (Swami Avimukteshwarananda) यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

संसदेत विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या पहिल्या भाषणात मोदींनी सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले होते. हिंदू हा मुळात अहिंसक आहे. पण, जे स्वत:ला हिंदू म्हणून घेतात ते सत्ताधारी हिंसक आहेत, असं राहुल गांधी म्हणाले होते. यावरून सत्ताधारी भाजपने राहुल यांनी संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हटल्याचा दावा केला होता. यावर स्वामी अविमुक्तेश्वरनंदा यांना पत्रकारने प्रश्न विचारला होता.

स्वामी अविमुक्तेश्वरनंदा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात पत्रकार त्यांना विचारतो की, राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हटलं आहे, याबाबत तुम्ही काय बोलाल. यावर शंकराचार्य म्हणाले की, ;मी राहुल गांधी यांचे संपूर्ण भाषण ऐकलं आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलंय की, हिंदू धर्मामध्ये हिंसेला स्थान नाही. ते हिंदूंबाबत काही चुकीचं बोलत असल्याचं मला आढळलं नाही.'

राहुल गांधी यांच्या भाषणातील केवळ एक भाग शेअर करणे चुकीचं आहे. जे अशाप्रकारचे कृत्य करत आहेत. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. अर्धसत्य सांगणे हा गुन्हा आहे. अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे. मग ते पत्रकार का असेनात. राहुल गांधी यांनी समोर बसलेल्या सत्ताधाऱ्यांना उद्देशून ते वक्तव्य केलं होतं, असं शं‍कराचार्यांनी सांगितलं.

प्रियांका गांधी यांनी देखील भावाच्या वक्तव्याचे समर्थन केले होते. माझ्या भाऊ कधीही हिंदूंविरोधात बोलू शकत नाही. तो भाजप आणि भाजप नेत्यांना उद्देशून म्हणाला होता, असं त्या म्हणाल्या. राहुल गांधींनी लोकसभेत ठणकावून सांगितलं होतं की, भाजप म्हणजे हिंदू समाज नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे हिंदू समाज नाही.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे लोकसभेमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता. राहुल गांधींच्या वक्तव्याला पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपच्या इतर बड्या नेत्यांनी उत्तर दिलं होतं. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT