Amit Shah
Amit Shah 
देश

Loksabha 2019 : अमित शहांविरोधात राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्री लढणार

वृत्तसंस्था

गांधीनगर : गांधीनगर मतदारसंघातून लढत असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात महाआघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांना उमेदवारी दिल्याची माहिती मिळत आहे.

भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे तिकीट कापून अमित शहा यांना गांधीनगरमधून उमेदवारी दिली आहे. गांधीनगर मतदारसंघात काँग्रेस आघाडीने तोडीचा उमेदवार देण्याच्या दिशेन हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप तिकीट वाटप अंतिम झालेले नाही. मात्र, शंकरसिंह वाघेला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी झालेली आहे.

शंकरसिंह वाघेला यांनी 1989 मध्ये याच मतदारसंघातून भाजपला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर हा मतदारसंघ लालकृष्ण अडवानी यांच्यासाठी सोडण्यात आला होता. आता पुन्हा एकदा अडवानींना हटविल्याने आघाडीने वाघेलांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसकडे कोणताही सक्षम उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून वाघेला यांच्या उमेदवारीसाठी मागणी होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT