शरद पवार Sakal
देश

'मी अजूनही सक्रिय राजकारण करू शकतो'; पवारांनी नाकारली राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची ऑफर

तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना राष्ट्रपती निवडणुकांच्या संदर्भात बैठकीसाठी आमंत्रण दिले होते.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकांच्या तयारीसाठी सर्व पक्षांनी मोट बांधली असून भाजपेतर राष्ट्रपती होण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलवली होती. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विरोधी पक्षांकडून आलेली राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची ऑफर त्यांनी नाकारली आहे. "मी अजून राजकारणात सक्रिय आहे." असं सांगत ही ऑफर त्यांनी नाकारली आहे.

दरम्यान काँग्रेस पक्षाने अजून कुणाचेही नाव जाहीर केलेले नाही. तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना राष्ट्रपती निवडणुकांच्या संदर्भात बैठकीसाठी आमंत्रण दिले होते. विरोधी पक्षाकडून शरद पवारांना उमेदवारी होण्याची संधीबद्दल विचारले असता त्यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार होण्यास नकार दिला.

(President Election Updates)

"ते अजूनही सक्रिय राजकारण करू शकतात." असं म्हणत त्यांनी उमेदवारीसाठी नकार दिला आहे. त्यानंतर काँग्रेसकडून कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा केली नाही. दरम्यान जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकांसाठी ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला पाच मोठे नेते गैरहजर होते.

दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपासून ईडी त्यांची चौकशी करत आहे. नॅशनल हेरॉल्ड केसमध्ये ईडीने त्यांच्यावर आरोप केले आहेत. दरम्यान डाव्या पक्षांनीही या बैठकीला हजेरी लावली आहे. पण जगन रेड्डी, आम आदमी पार्टी, अकाली दल, तेलंगणा राष्ट्र समितीचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे या बैठकीला हजर होते.

दरम्यान जुलैमध्ये राष्ट्रपतींची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी भाजपेतर पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपविरहित राष्ट्रपती उमेदवार देण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न सुरू आहेत. यावर चर्चा करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT