Sharad Pawar 
देश

Sharad Pawar: शरद पवार चक्रव्यूहात! मोदींना पुरस्कार की राज्यसभेत मतदान, काय निवडणार?

Sandip Kapde

Sharad Pawar Latest News :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार १ ऑगस्ट रोजी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठ शेअर करणार आहेत. १ तारखेला मोदींना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शरद पवार प्रमुख पाहुणे आहेत.

मात्र मंगळवारी राज्यसभेत एका महत्त्वाच्या विधेयकावर मतदान होण्याची शक्यता आहे. दिल्ली अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात हे विधेयक आहे. यावरुन भाजप आणि आम आदमी पक्षांमध्ये राजकीय घमासान सुरू आहे. हे विधेयक भाजपसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे.

शरद पवार यांनी पुण्याला न राहता राज्यसभेत मतदानासाठी हजर राहावे, असे आपचे मत आहे. अरविंद केजरीवाल हे शरद पवार यांना विनंती करणार आहेत.

३१ किंवा १ तारखेला विधेयक मांडल्याची चर्चा आहेत. काल संसदेच्या सत्रानंतर विरोधकांची बैठक झाली. यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितवरुन नाराजी व्यक्त केली. इंडिया आघाडीमध्ये नाराजी सुरू आहे.

हे विधेयक विरोधकांसाठी देखील महत्त्वाचे आहे. यामुळे विरोधकांची ऐकी दिसणार आहे. त्यामुळे शरद पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमाला हजर न राहता राज्यसभेत मतदानासाठी हजर राहावे.  

विरोधकांनी सर्व सदस्यांना व्हीप जारी केला आहे. जेडीयूनं काल सर्व खासदारांना व्हीप जारी केला. राज्यसभेच्या उपसभापतींना देखील व्हीप जारी केला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या निर्णयाकडे सर्व विरोधकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निळी मफलर डोळ्यावर गॉगल, राज ठाकरे मेळाव्याच्या स्थळी दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT