Sharad Pawar and Farukh Abdulla 
देश

काश्मीर भारतात राहण्यात फारुख अब्दुल्ला यांच्या वडिलांचं योगदान मोठं : शरद पवार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नाव देण्यासाठी छगन भुजबळ यांचं योगदान असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलं. छगन भुजबळ यांच्या पंचाहत्तीरीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (Sharad Pawar news in Marathi)

छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ सोहळा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी भुजबळ यांच्या कार्याचा गौरव केला.

दिल्लीत सगळ्या राज्य सरकारांची निवासस्थाने आहेत. त्यात महाराष्ट्राचं निवासस्थान सर्वात उत्तम आहे. लोक विचारतात हे कोणी बांधलं. ही वास्तू भुजबळ यांनी उभारली. पुण्यातील विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाव देण्यासाठी भुजबळ यांचं योगदान मोठं आहे. हे कोणाला माहित नाही, असंही पवार म्हणाले.

यावेळी पवार म्हणाले की, या देशात काश्मीर राहिलं, त्यात फारुख अब्दुल्ला यांच्या वडिलांचं योगदान मोठ आहे. अब्दुल्ला कुटुंबाची संपूर्ण निष्ठा कायम भारताच्या ऐक्याशी आहे, असंही पवार यांनी म्हटलं. या कार्यक्रमाला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला देखील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT