Sharad Pawar tribute to Vajpayee
Sharad Pawar tribute to Vajpayee 
देश

Atal Bihari Vajpayee: अन् मला वाजपेयींचा फोन आला- शरद पवार

सकाळवृत्तसेवा

पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील सभ्यता आणि सुसंस्कृतपणा कसा जपावा, हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. अखंड राजकीय जीवनात त्यांनी संसदेची प्रतिष्ठा कायम जपली या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. 

पवार म्हणाले, "" मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना "पुलोद'च्या काळात जनता पार्टीच्या रूपाने वाजपेयींचे महाराष्ट्रातील सहकारी आमच्यासोबत होते. त्यावेळी बैठकीनिमित्त मी पहिल्यांदा वाजपेयी यांना भेटलो होतो.'' राजकारणाचा भाग म्हणून त्यांच्याशी सततचा संपर्क होता. 1996 साली वाजपेयी यांचे 13 दिवसांचे सरकार पडले. तेव्हा मी कॉंग्रेसचा संसदीय नेता होतो. या नात्याने वाजपेयी यांच्या सरकारविरोधात अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मी केलेले भाषण त्यांनी शांततणे ऐकून घेतले. त्यानंतर वाजपेयी यांनी राजीनामा दिला. त्या रात्री त्यांचा मला फोन आला व संसदेत केलेल्या भाषणाबद्दल त्यांनी माझे कौतुक केले. अशाप्रकारे राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक उमदा माणूस मी पाहिला. 

वाजपेयी पंतप्रधान असताना विरोधी पक्षाच्यावतीेने मी त्यांच्याबरोबर परदेश दौऱ्यावर गेलो होतो. या दौऱ्यात रोजच्या-रोज ते आमच्याशी चर्चा करायचे. प्रत्येक विषयावर आपल्या देशाची भूमिका काय असावी, हे सांगायचे शिवाय त्यावर आमच्या सूचना असतील तर या सूचनांची तातडीने दखल घ्यायचे, अशी आठवण पवार यांनी सांगितली.

गुजरातमध्ये २००२ मध्ये भूकंप आला होता. त्यात मोठी हानी झाली होती. भूकंप झाल्यानंतर केल्या जाणाऱ्या पुनर्वसनाचा मला अनुभव होता. मी स्वतः वाजपेयी यांनी गुजरातला याबाबत सहकार्य करण्याची तयारी असल्याचे कळवले. त्यानंतर त्यांच्याच सरकारच्या काळात आपत्ती निवारण प्राधिकरण स्थापन करून त्याच्या अध्यक्षपदी माझी निवड केली. विरोधी पक्षांच्या चांगल्या सूचनांचाही ते नेहमी आदर करायचे, असा अनुभव पवार यांनी सांगितला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT