sharad pawar amit shah sakal
देश

Sharad Pawar: NCP अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांच लक्ष दिल्लीत; ट्विट करत म्हणाले...

शरद पवार यांनी या ट्वीटच्या माध्यमातून देशातील एका महत्त्वपूर्ण घटनेवर भाष्य केलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

NCP News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसापूर्वी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा असा आग्रह राष्ट्रवादीच्या सर्व नेतेमंडळींकडून तसेच कार्यकर्त्याकडून केला जात आहे.

यावर शरद पवार विचार करून निर्णय कळवतील असं म्हणाले आहेत. या सर्व घडामोडी राज्यात सुरू असतानाच शरद पवार देशातील विविध गोष्टींवर आपली भूमिका रोखठोकपणे मांडताना दिसून येत आहेत. आजही शरद पवार यांनी देशातील एका घटनेसंदर्भात केंद्रीय मंत्री अमित शाह यांना टॅग करत ट्विट केलं आहे.

शरद पवार यांनी या ट्वीटच्या माध्यमातून देशातील एका महत्त्वपूर्ण घटनेवर भाष्य केलं आहे. याबाबत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ट्वीटमध्ये टॅग करत आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंचे काही दिवसांपासुन आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, खेळाडूंनी पाठिंबा दिला आहे.

आंदोलक महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. पण त्या मोर्चातील विद्यार्थींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकारावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता यासंबधी शरद पवार यांनी ट्वीट केलं आहे.

"दिल्लीत बृजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारलं आहे, त्याच्या समर्थनार्थ दिल्लीतील कॉलेजच्या विद्यार्थींनींनी एक रॅली काढली होती. त्या रॅलीमधील विद्यार्थींनींशी पोलिसांनी केलेले वर्तन हे अतिशय चुकीचे, खूपच वेदनादायी आणि वाईट आहेत.

शांतपणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध करतो. मी वैयक्तिकरित्या गृहमंत्र्यांना आवाहन करतो की, आता त्यांनीच या प्रकरणात लक्ष घालावं" असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.

काल (बुधवारी) मध्यरात्री दिल्ली पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यात महिला कुस्तीपटूंना शिविगाळ केल्याचा आरोपही या खेळाडूंनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT