Sharjeel Imam, JNU Student Accused Of Sedition, Arrested In Bihar 
देश

देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली जेएनयूच्या शर्जील इमामला अटक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता शर्जील इमामला आज देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली आहे. सीएए कायद्याच्या विरोधात शाहीन बाग येथे करण्यात आलेल्या निदर्शनांमागे शर्जीलचा मुख्य सहभाग असल्याचे सांगत त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीसह पाटणा व मुंबईतही काही ठिकाणी छापे टाकण्यात आल्यानंतरही शर्जील हाती लागला नव्हता. आज (ता.२८) त्याला जहानाबादमधील काको येथून अटक करण्यात आली. शर्जीलच्या वकिलांनी मात्र शर्जील स्वत:हून पोलिसांपुढे हजर झाला असल्याचे सांगितले आहे. हजर झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असल्याचा दावा वकिलांकडून करण्यात आला आहे.

सुबोध भावे दिसणार शरद पवारांच्या भूमिकेत?

तत्पूर्वी, शर्जीलविरुद्ध दिल्लीसह बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मणिपूर अशा एकूण सहा राज्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली पोलिसांची पाच पथके त्याच्या मागावर होती. अखेर दिल्ली पोलिसांना आज त्याला अटक करण्यात यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Konde: ठाकरे गटाच्या पदाधिकारी रेखा कोंडे यांना पुण्यात मारहाण; आरती मारणे-पवार यांची बदनामी केल्याचा आरोप

Solapur University : सोलापूर विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांतील मुलींना तीन महिन्यांचे मोफत कराटे प्रशिक्षण; सत्र परीक्षेनंतर प्रशिक्षणाला सुरुवात

Ambegaon News : दिल्लीतील ऐतिहासिक आणि वैज्ञानिक स्थळांना विद्यार्थ्यांची भेट; पुणे जिल्ह्यातील ५१ विद्यार्थी आणि सात शिक्षक अभ्यास दौऱ्यात सहभागी

Manchar News : मंचर विकास आराखड्यात दुरुस्ती करण्याचे मुख्याधिकारी किरण मार्कंड यांचे लेखी आश्वासन; ग्रामस्थांनी उपोषण घेतले मागे

India A Beat Nepal: आधी तिलक कुशाग्राची शतकांची आतषबाजी, मग प्रिन्स यादव हर्षित राणाचा कहर; भारत 'अ' संघाचा नेपाळवर ३०६ धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT