tharoor 
देश

दहावीतील मुलीचं इंग्लिश ऐकून शशि थरूर निशब्द; विचारलं,'अर्थ काय?'

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - काँग्रेस खासदार शशि थरूर यांच्या इंग्रजीबद्दल नेहमीच चर्चा होत असते. अनेकदा त्यांनी केलेल्या ट्विटचा अर्थ समजण्यासाठी डिक्शनरी वापरावी लागते. मात्र आता हेच शशि थरूर एका दहावीच्या मुलीचे इंग्रजी ऐकून निशब्द झाले आहेत. त्यांनी मुलीलाच तिच्या बोलण्याचा अर्थ विचारला आहे. केरळमधील एका मुलीने इंग्रजीत इतका मोठा शब्द उच्चारला की तो ऐकून शशि थरूरसुद्धा थक्क झाले. 

शशि थरूर जे इंग्रजी शब्द वापरतात त्यामुळे अनेकदा ट्विटरसह सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगते. दहावीतील एका मुलीने त्यांच्यासमोर अशी काही इंग्रजी बोलून दाखवली की त्यानंतर शशि थरूर यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. क्लब एफएममध्ये बोलताना मुलीने चर्चेवेळी एक शब्द शशि थरूर यांना ऐकवला होता. 

केरळमधील एक खासगी रेडिओ चॅनेल असलेल्या क्लब रेडिओमध्ये नुकताच एक कार्यक्रम पार पडला. यामध्ये इंग्रजीचं कौशल्य दाखवण्यात येत होतं. यावेळी शशि थरूर यांनी दिया नावाच्या मुलीचं तोंडभरून कौतुक केलं. दियाने शशि थरूर यांना टॅग करून शब्द उच्चारण्यास सांगितलं होतं. 

कार्यक्रम सुरू असताना दियाने न थांबता टंग ट्विस्ट करून पूर्ण शब्द सलग उच्चारला. तेव्हा शशि थरूर यांनी थेट हार पत्करली. पूर्ण शब्द ऐकल्यानंतर शशि थरूर यांनी त्याचा अर्थही विचारला. त्यावर दियाने हे एका काल्पनिक खाद्यपदार्थाचे नाव आहे.

थरूर यांनी म्हटलं की, शब्द लक्षात ठेवणं आणि त्याचा पुन्हा उच्चार करणं ही लहानशी गोष्ट नाही. तिला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि प्रत्येकजण असं करू शकत नाही. तिच्याकडे चांगली स्मरणशक्ती आणि एकाग्रता आहे. माझा सल्ला आहे की, असे शब्द शिका जे वापरात आणता येतील. 

शशि थरूर यांनी ट्विटरवर एक लिंक शेअर केली आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की, दहावीत शिकणाऱ्या दियाची अद्भूत गोष्ट, जी मी कधीच ऐकली नाही आणि माझ्यासाठी हे एक आश्चर्यच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT