Shashi Tharoor

 

sakal

देश

Shashi Tharoor absence from Rahul Gandhi meeting : राहुल गांधींच्या बैठकीला शशी थरूर सलग तिसऱ्यांदा गैरहजर ; चर्चांना उधाण!

Shashi Tharoor Update News :विशेष म्हणजे पुतीन यांच्या डिनरला मात्र शशी थरूर यांची उपस्थिती होती

Mayur Ratnaparkhe

Shashi Tharoor Skips Rahul Gandhi Meeting for the Third Time : काँग्रेस खासदार शशी थरूर हे आज(शुक्रवार) राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या लोकसभा खासदारांच्या बैठकीस गैरहजर होते. विशेष म्हणजे थरूर याआधीही पक्षाच्या काही महत्त्वाच्या बैठकांना अनुपस्थित दिसून आले. त्यामुळे आता थरूर यांच्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

खरंतर थरूर यांनी बैठकीला त्यांच्या अनुपस्थितीची आधीच माहिती दिली होती, परंतु  काँग्रेसचे मुख्य प्रतोद म्हणाले की त्यांना थरूर यांच्या अनुपस्थितीचे कारण माहित नाही. विशेष काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा राष्ट्रपतींनी त्यांच्या सन्मानार्थ आयोजित डिनरच्या वेळी थरूर हे उपस्थित होते.

शिवाय, तिरुवनंतपुरमचे खासदार असणाऱ्या थरूर यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर कौतुकही केलेले आहे, ज्यामुळे त्यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत.

लोकसभा विरोधी पक्षेते राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली या महत्त्वाच्या बैठकीला खासदार शशी थरूर  यांच्यासोबतच खासदार मनीष तिवारी देखील अनुपस्थित होते. तर ३० नोव्हेंबर २०२५ रोजी काँग्रेस स्ट्रॅटेजी ग्रुपच्या बैठकीत जाणूनबुजून अनुपस्थित नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर, काही दिवसांनीच शशी थरूर यांची बैठकीला अनुपस्थिती दिसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयामध्ये ऐतिहासिक वस्तूंची माहिती देणारं प्रदर्शन

Pune Traffic Update : शिवणे- नांदेड पूल रस्ता शनिवारी रात्री वाहतुकीसाठी बंद; महावितरणची भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम!

'अरे ९० वर आहे, आऊट होईल...'! खेळाडूने स्लेजिंग केली, Vaibhav Suryavanshi चा 'Cute' रिप्लाय; मोडला गिल, AB चा विक्रम...

Solapur Crime : ‘हलगी का वाजवत जातोस?’ म्हणत हल्ला; बार्शीच्या वांगरवाडीत चार जणांविरोधात 'ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT