shashi tharoor sakal
देश

शशी थरूर अखेर दोषमुक्त

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी दिल्ली कोर्टाचे आदेश

सकाळ वृत्तसेवा/(पीटीआय)

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांना मोठा दिलासा देताना त्यांना दोषमुक्त केले. आज याबाबत झालेल्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी हे आदेश दिले. या आदेशांनंतर थरूर यांनी न्यायाधीशांचे आभार मानले असून मागील साडेसात वर्षांपासून मी अक्षरशः छळाला सामोरे जात होतो, हा माझ्यासाठी खरोखरच एक मोठा दिलासा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी थरूर यांच्यावर विविध आरोप निश्‍चित करण्याची मागणी केली, यामध्ये ‘कलम-३०६’ चा (आत्महत्येला चिथावणी) देखील समावेश होता. (Shashi Tharoor News)

थरूर यांची बाजू मांडताना विधिज्ञ विकास पाहवा म्हणाले, की ‘‘ या प्रकाराची विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) माध्यमातून चौकशी झाली असून या पथकाने थरूर यांना सर्व आरोपांतून मुक्त केले आहे. सध्या थरूर यांच्याविरोधात कसल्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद नसल्याने त्यांना दोषमुक्त करण्यात यावे.’’ सुनंदा पुष्कर यांचे कुटुंबीय आणि मित्रांनी देखील त्या आत्महत्या करूच शकत नाही असे सांगताना हा चिथावणीचा प्रकार असू शकत नाही असे म्हटले होते. शवविच्छेदन अहवाल आणि अन्य वैद्यकीय अहवालांत देखील हा आत्महत्या अथवा खुनाचा प्रकार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोलिसांनी केलेले आत्महत्येला चिथावणी देण्याचे किंवा क्रौर्याचे आरोप हे निरर्थक असल्याचा दावा पाहवा यांनी केला. पुष्कर यांचे कुटुंबीय, मित्रांनी छळवणूक अथवा चिथावणीची कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याची बाब यावेळी थरूर यांच्या वकिलांनी निदर्शनास आणली.

गुन्हे दाखल

सुनंदा पुष्कर या १७ जानेवारी २०१४ रोजी येथील एका पंचतारांकित हॉटेलातील स्यूटमध्ये मृतावस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ निर्माण झाली होती. थरूर यांच्या अधिकृत निवासाच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने या दाम्पत्याचे येथील हॉटेलात वास्तव्य होते. या घटनेनंतर थरूर यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते पण त्यांना अटक मात्र झाली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...'

Nashik Dindori accident : नाशिक येथील दिंडोरी अपघातातील एकाच कुटुंबातील ९ मृतांची नावे समोर, क्रेनने काढले मृतदेह बाहेर

Farmer Death News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेतात काम करताना अंगावर वीज पडली; 50 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातच्या पत्नी कल्पना खरातचा अद्यापही लागला नाही शोध

SCROLL FOR NEXT