shashi tharoor sakal
देश

सिंगापूर PMच्या वक्तव्यावरून थरुरांचा मोदी सरकारला टोला; म्हणाले, 'जाड कातडीचे...'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सिंगापूरसारख्या आपल्या एका मित्र देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या संसदेत काही विधाने केली. त्यावरून परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या राजदूताला पाचारण केले. हे अगदी अनुचित आहे. आपण जरा कमी जाड कातडीचे बनायला शिकलेच पाहिजे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केंद्रातील भाजप सरकारला टोला लगावला आहे. (Shashi Tharoor)

सिंगापूरचे पंतप्रधान ली हेईन लुंग यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भारतातील निम्म्या खासदारांवर गुन्हे दाखल असल्याचे वक्तव्य केले. सुमारे ४० मिनिटांच्या भाषणात त्यांनी भारताबाबत केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यांच्या भाषणानंतर काही तासांत सिंगापूरचे भारतामधील राजदूत सायमन वोंग यांना पाचारण करून भारताने नाराजी नोंदविली.

या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला टोला लगावण्याची संधी थरूर यांनी साधली. त्यांनी ट्विटची मालिका रचली. माजी परराष्ट्र मंत्री असलेले थरूर म्हणाले की, ली हे एक सर्वसाधारण (आणि बराचसा अचूक) मुद्दा मांडत होते. आमच्या स्वतःच्या देशातील राजकारणी मंडळी जे काही शब्द उच्चारतात ते बघता आपण इतक्या सुद्धा जाड कातडीचे बनायला नको.

आपण एक निवेदन जारी करून हा विषय हाताळायला हवा होता. आम्ही तुमच्या पंतप्रधानांचे वक्तव्य अगदी रस घेऊन ऐकले, मात्र आम्ही इतर देशांच्या अंतर्गत बाबी, परदेशांमधील संसदांमधील वादविवाद अशा बाबतीत भाष्य करीत नाहीत. याच तत्त्वाचे प्रत्येकाने पालन करावे असे आमचे आवाहन आहे, असे या निवेदनात म्हणता आले असते, असंही शशी थरुर यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT