shashi tharoor 
देश

'भारतीय इंधनावर देतात 260% टॅक्स'; दरवाढीविरोधात शशी थरुरांचं हटके आंदोलन

सकाळवृत्तसेवा

तिरुवनंतपुरम : गेल्या महिन्याभरापासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी वाढता क्रम धरला आहे. सातत्याने इंधनांच्या किंमती या वाढतच असून सर्वसामान्य भारतीय नागरिकांना त्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. सध्याचे इंधनाचे दर हे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च पातळीवरचे दर आहेत. पेट्रोलने जवळपास 100 रुपये प्रति लीटरचा आकडा गाठल्याचं चित्र संपूर्ण भारतभर आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर नागरिकांकडून तसेच विरोधकांकडून सडकून टीका करण्यात येत आहे. 

काँग्रेस नेते शशी थरुर यांनी आज शुक्रवारी तिरुवनंतरपूरममध्ये वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरुन केंद्र सरकारला धारेवर धरणारं आंदोलन केलं. यावेळी त्यांनी एका ऑटोरिक्षाला रस्सीने ओढून केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवला. यावेळी 100 हून अधिक रिक्षा केंद्र आणि राज्य सरकारच्या दरवाढीविरोधातील आंदोलनात सहभागी झाल्याचं त्यांनी म्हटलं.

शशी थरुर यांनी या आंदोलनाचा व्हिडीओ देखील आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये ते एका ऑटोरिक्षाला रस्सीच्या सहाय्याने खेचताना दिसत आहेत. तसेच यावेळी त्यांनी गगनाला भिडलेल्या इंधन दरवाढीविरोधात घोषणाही दिल्या. यावेळी त्यांच्या या आंदोलनात अनेक ऑटोरिक्षाचालक तसेच काँग्रेसचे अनेक कार्यक्ते देखील सामील झाले होते. 

आपल्या ट्विटमध्ये शशी थरुर यांनी म्हटलंय की, इंधनाच्या किंमतींना आवाक्यात ठेवण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या लूटीविरोधात प्रतिकात्मकरित्या रिक्षा ओढून आंदोलन केले. यावेळी 100 हून अधिक रिक्षा सहभागी झाल्याचं त्यांनी म्हटलं. दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात तीव्र शब्दात हल्लाबोल केला. तसेच त्यांनी असाही दावा केला की, भारतीय नागरिक 260 टक्के टॅक्स इंधनावर देतात तर अमेरिकन नागरिक फक्त 20 टक्के टॅक्स देतात. 

तसेच जाचक वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीविरोधात आज भारतभरात बंद पुकारण्यात आला असून ठिकठिकाणी चक्काजामही करण्यात येणार असल्याचं कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं (सीएआयटी) कळवलं होतं. व्यापारी, वाहतुकदार आणि कर व्यावसायिकांचा या बंदमध्ये सहभाग नोंदवला असून त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पहायला मिळालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT