sheena bora news esakal
देश

शीना बोरा जिवंत आहे की नाही? सीबीआयने पुराव्यांसह दिली महत्त्वाची माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः दहा वर्षांपूर्वीच्या शीनाबोरा हत्या प्रकरणामध्ये आज महत्त्वाचा खुलासा झाला आहे. सीबीआयने कोर्टामध्ये याबाबत स्पष्टपणे माहिती दिलीय.

5 जानेवारी रोजी शीना बोरा गुवाहटीमध्ये दिसल्याचं सांगितलं जात आहे. शीना बोराला पाहिल्याचा दावा सविना बेदी यांनी केलाय. सविना ह्या मखर्जी परिवाराशी परिचित आहेत. सकाळी पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान शीनाला पाहिल्याचा दावा केला होता.

याबाबत सीबीआयने स्पष्टीकरण दिलेलं असून शीना बोराचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. त्याबाबतचे सक्षम पुरावे असल्याचं म्हटलं आहे. शीना बोराच्या मृत्यूसंबंधीच्या पुराव्यांना शास्त्रीय आधार असल्याचा दावा सीबीआयने केलाय.

हेही वाचाः गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

याबाबात उलट तपासणीसाठी गुवाहटी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज नसल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. शीना बोराला पाहिल्याचं ज्यांनी सांगितलं त्या सविना ह्या वकील आहेत.

शीनाचा व्हीडिओ केल्याचा दावा

सविना बेदी यांनी शीना बोराला विमानतळावर पाहिल्याचा दावा केला. त्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु कथित शीना तिथून पसार झाली. सविना यांनी शीनाचा व्हीडिओ काढल्याचंही सांगितलं जात आहे.

एप्रिल २०१२ मध्ये शीना बोराची हत्या झाली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर इंद्राणी मुखर्जीच्या वाहन चालकाला अटक करण्यात आली होती. चालक श्यामवर राय याने शीनाचा खून इंद्राणी मुखर्जीनेच गळा दाबून केल्याचा जबाब दिला होता. त्यानंतर २०१५मध्ये इंद्राणीला अटक करण्यात आली होती. आता पुन्हा शीना गुवाहटीमध्ये दिसल्याचा दावा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Law: नामांकन वादांना पूर्णविराम? निवडणूक कायद्यात बदलांना मंजुरी; महापालिका निवडणुकीआधी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

Gen-Z Post Office: मुंबईत पहिले जेन-झी पोस्ट ऑफिस! विद्यार्थ्यांना विशेष फायदा होणार, काय आहेत सुविधा?

Railway Luggage Rules : विमानासारखेच नियम रेल्वेमध्येही लागू होणार! , ‘फर्स्ट एसी’मध्ये ७० किलो पर्यंतच सामान मोफत नेता येणार

Latest Marathi News Live Update : माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा

Pune Crime : अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई; साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त; पाच जणांना अटक!

SCROLL FOR NEXT