Rahul Narvekar 
देश

ShindeVsThackeray: विधानसभा अध्यक्षांची निवड चुकीची; सिब्बल यांचा मोठा दावा

राज्यातील सत्ता संघर्षावर आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षावर आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे. यावेळी ठाकरे गटाच्यावतीनं अॅड. कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची निवड चुकीची असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर इतर महत्वाच्या मुद्द्यांवरही यावेळी त्यांनी भाष्य केलं. (Shinde Vs Thackeray Kapil Sibbal raised question on election of Speaker)

सिब्बल म्हणाले, एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला हजर राहिले नाहीत, याचाच अर्थ घोडेबाजार झाला आहे. शिंदे यांच्यावर अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना राज्यपालांनी त्यांना शपथ घेऊ दिली. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना बहुमतापेक्षा एक मत कमी पडलं असतानाही त्यांनी निवड करण्यात आली.

तसेच गुवाहाटीत बसून तुम्ही महाराष्ट्राबाबत निर्णय घेऊ शकत नाही, असं सांगताना शिंदेंनी महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी दुसऱ्या राज्याची मदत घेतली गेली, असंही सिब्बल यावेळी म्हणाले. तसेच अविश्वास प्रस्तावाचा मेल हा अधिकृत ईमेलवरुन आला नव्हता असंही सिब्बल यांनी आपल्या युक्तीवादात म्हटलं आहे.

राज्यपालांवर टीका करताना बहुमत न पाहता राज्यपालांनी पहाटेचा शपथविधी कसा उरकला? असा सवालही यावेळी सिब्बल यांनी केला. तसेच १२ आमदारांचा प्रश्न प्रलंबित ठेवणं राज्यापालांचं राजकारण असल्याचं सांगताना राज्यपालांनी आपल्या अधिकारांचं उल्लंघन केल्याचं सिब्बल युक्तीवादादरम्यान म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajaj Pune Grand Tour Traffic Update : 'बजाज पुणे ग्रँड टूर स्टेज-2'साठी २१ जानेवारीला पुण्यातील वाहतुकीत बदल!

Team India Under Gambhir: 'अजिंक्य' टीम इंडियाची घरच्या मैदानावर वाताहत; कोच गौतम गंभीरचे रिपोर्ट कार्ड पाहून बसेल धक्का!

Ambegaon Political : आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का; माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश!

Pune Nylon Manja : नॉयलॉन मांजाचा कहर: औंध-बाणेर व येरवड्यात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी!

Toll Rules : 'या' तारखेपासून टोल नाक्यावर रोख पैसे बंद! FASTag किंवा UPI वापरुनच करता येणार पेमेंट, प्रवाशांसाठी 3 महत्वाच्या सूचना पाहा

SCROLL FOR NEXT