Nagesh Patil Ashtikar 
देश

Shiv Sena MP: शिवसेनेच्या खासदारानं शपथविधीवेळी घेतलं बाळासाहेबांचं नाव! पुन्हा घ्यायला लावली शपथ

निलेश लंकेनी इंग्रजीत शपथ घेतल्यानं ते देखील आज चर्चेत आले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारानं लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेताना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं. पण यामुळं शपथ घेण्याच्या पद्धतीत बदल केल्यानं त्यांना प्रोटेम अध्यक्षांनी पुन्हा शपथ घ्यायला सांगितलं. त्यानंतर बाळासाहेबांचं नाव वगळून या खासदारांनी पुन्हा शपथ घेतली. (Shiv Sena MP Nagesh Patil Ashtikar take oath again in Loksabha due to took Balasaheb Thacekeray name during event)

बाळासाहेब ठाकरेंचं घेतलं नाव

ठाकरेंच्या शिवेसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. पण यामध्ये त्यांनी एक चूक केली, ती म्हणजे शपथ घेताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं. पण शपथ घेताना अशा प्रकारे कोणालाही स्मरुन शपथ घेणं हे नियमात बसत नसल्यानं त्यांना प्रोटेम स्पिकर भर्तुहरी महताब यांनी आष्टीकर यांना पुन्हा शपथ घ्यायला सांगितलं.

पुन्हा घेतली शपथ

यानंतर नागेश पाटील आष्टीकर यांनी पुन्हा शपथ घेताना त्यातून बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेणं वगळलं आणि त्यांचा शपथविधी पूर्ण झाला. पण या प्रकरामुळं आष्टीकर काही काळ चर्चेत आले. याच शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनीही शपथा घेतल्या.

निलेश लंकेंनी घेतील इंग्रजीतून शपथ

यामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यांचे विरोधक सुजय विखे यांनी त्यांना इंग्रजी बोलता येत नसल्याच्या मुद्द्यावरुन हिणवलं होतं. त्यामुळं लंके यांनी चक्क इंग्रजीतून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यावर शरद पवारांनी लंकेंनी विखेंना चांगल प्रत्युत्तर दिल्याचं समाधाना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT