ShivSena Donation_Ram Mandir 
देश

Ram Mandir: शिंदेच्या शिवसेनेकडून राम मंदिरासाठी 11 कोटींची देणगी; चंपत राय यांच्याकडं धनादेश सपूर्द

राम मंदिराचं येत्या २२ जानेवारी रोजी उद्धाटन होणार असून रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

अयोध्या : राम मंदिराचं येत्या २२ जानेवारी रोजी उद्धाटन होणार असून रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून ११ कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री उदय सामंत या दोघांनी खुद्द अयोध्येला जाऊन ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडं हा धनादेश सुपूर्द केला. (Shiv Sena Shinde fraction donates 11 crores for Ram Mandir in Ayodhya Cheque handed over to Champat Rai)

मुख्यमंत्र्यांचे आभार - चंपत राय

धनादेश प्राप्त झाल्यानंतर चंपत राय यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राय म्हणाले, महाराष्ट्राच्या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि राम भक्तांच्यावतीनं ११ कोटी रुपयांचा चेक आणला आहे. हे पैसे बँकेतही ट्रासन्फर झाले आहेत.

या पैशांची पावती देखील त्यांना देण्यात आली आहे. हा आमचा उत्साह वाढवणारा क्षण आहे. मी महाराष्ट्रातील जनतेच्याप्रती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रती तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. (Latest Marathi News)

श्रीकांत शिंदेंनी केलं ट्विट

दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी देखील ट्विट करुन याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकारानं आज गेल्या अनेक दशकांपासून ज्याची सर्व देशवासी आतुरतेने वाट पाहात होते, तो क्षण, अर्थातच अयोध्येत श्रीरामाचं भव्य मंदिर उभं राहत आहे. या मंदिर उभारणीच्या संघर्षात आजवर अनेक कारसेवकांचे, शिवसैनिकांचे आणि रामभक्तांचं योगदान लाभलं आहे.  (Latest Maharashtra News)

बाळासाहेबांचं स्वप्न होतंय पूर्ण

हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज प्रत्यक्षात येत आहे. येत्या २२ तारखेला या मंदिराचे भव्य दिव्य स्वरूपात उद्घाटन पार पडणार आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी योगदान म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना पक्षाच्यावतीने आणि सर्व महाराष्ट्रवासियांच्यावतीने ११ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. (Marathi Tajya Batmya)

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपतराय यांच्याकडे हा धनादेश आज सुपूर्द केला. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेनेचे राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT