ShivSena Party Symbol Row
ShivSena Party Symbol Row 
देश

ShivSena Symbol Row: 'धनुष्यबाण' चिन्हाबाबत प्रश्नचिन्ह कायम! 'या' दिवशी होणार पुढील सुनावणी

सकाळ डिजिटल टीम

Shivsena Symbol Row final descision : शिवसेनेच्या फुटीनंतर धनुष्यबाण या पक्षचिन्हासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी पार पडली.

यावेळी सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन आणि इतर तांत्रिक गोष्टी तपासून शिवसेनेचं चिन्ह 'धनुष्यबाण' हे कोणत्या गटाकडे जाणार य़ावर निर्णय येणं अपेक्षित होतं पण निर्णय येऊ शकलेला नाही. कारण या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्याता आली आहे. (Shiv sena symbol row eknath shinde uddhav thackeray election commission of india bow and arrow hearing)

दोन्ही बाजुंच्या वकिलांचा असा झाला युक्तीवाद?

उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी पुढील मुद्द्यांवर केला युक्तीवाद

१) शिवसेनेतला कोणतागी गट नाही तर कपोकल्पित आहे. शिवसेनेतील फूट म्हणजे कल्पना आहे. शिवसेनेत दाखवलेल्या फुटीला काहीही अस्तित्व नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे. शिवसेनतील फुट आयोगाने ग्राह्य धरु नये.

२) शिंदे गटाने दाखल केलेली कागदपत्रं बोगस आहेत. या कागपत्रांमध्ये त्रुटी आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत प्रतिक्षा करा.तसेच काही लोकांनी पक्षातून बाहेर पडणे हे बेकायदेशीर आहे.

३) शिंदे गटाची कागपत्र खरी असतील तर ओळख परेड करा, अशी महत्वाची मागणी कपील सिब्बल यांनी केली. लोकप्रतिनिधी आणि पक्ष वेगळा आहे. आमदार, खासदार पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे आधी कोर्टाचा निर्णय येऊ द्या.

४) पक्षात होता तेव्हा आक्षेप का घेतला नाही. पक्षाचा लाभ घेतला आणि परत लोकशाही नाही असे म्हणता. पक्षाच्या धोरणांना माणूनच मतदार मतादान करत असतात. सर्व आमदार, खासदार शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले आहेत.

५) आतापर्यंत उमेदवारांना एबी फॉर्म दिला जात होता. मग आता आक्षेप का? तसेच पक्षाअंतर्गत निवडणुका घेण्यास मुदतवाढ द्या, अशी मागणी देखील कपिल सिब्बल यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांची २३ जानेवारीला पक्षप्रमुख मुदत संपत आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांनी पुढील मुद्द्यांवर केला युक्तीवाद

१) आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे त्यामुळे चिन्हाचा निर्यण तातडीने घ्यावा. पक्षाचा मोठा गट लोकप्रतिनिधींसोबत बाहेर पडल्यास तो बेकायदेशीर कसा?

२) शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल म्हणाले होते. दरम्यान, महेश जेठमलानी यांनी हा दावा फेटाळला आहे. कागदत्रांमध्ये कुठलीही त्रुटी नसल्याचे जेठमलानी यांनी स्पष्ट केले. तसेच आमदार आणि खासदार यांचं बहुमत शिंदे गटाकडे असल्याचा दावा त्यांनी केला.

३) याआधीच्या काही निकालांचा दाखला शिंदे गटाने निवडणूक आयोगात दिला. यामध्ये सादिक अली प्रकरणाचा दाखला देण्यात आला. धनुष्यबाण चिन्हासाठी बहुमत आवश्यक आहे ते बहुमत शिंदे गटाकडे असल्याचं जेठमलानी म्हणाले. 

नक्की वाद काय होता?

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड करत आपली वेगळी चूल मांडली. यामुळं विधानसभेत संख्याबळ कमी झाल्यानं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं.

यामुळं शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट निर्माण झाले. पण अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी या दोन्ही गटांमध्ये चिन्हावरुन संघर्ष निर्माण झाला.

त्यानंतर निवडणूक आयोगानं या दोन्ही गटांसाठी तात्पुरती चिन्हं बहाल केली तसेच दोन्ही गटांना वेगळी नावंही दिली. त्यानुसार, उद्धव ठाकरे गटाचं नाव 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' आणि चिन्ह 'मशाल' देण्यात आलं. तर एकनाथ शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव आणि 'ढाल-तलावर' हे चिन्ह देण्यात आलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT