sanjay raut. 
देश

ईडीच्या कार्यालयासमोरच जोड्याने मारेन, संतापलेल्या संजय राऊतांनी ठणकावलं

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- भाजप नेत्यांकडून सातत्याने होणाऱ्या आरोपांवरुन शिवसेना नेते संजय राऊत संतापले आहेत. त्यांनी जोरटार पलटवार करत, जर आरोप सिद्ध झाले नाहीत तर  ईडीच्या कार्यालयासमोर आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारणार असल्याचं जाहीर केलं आहे. बेफाट आरोप केले जात असून यातून काहीही निष्पन्न होणार नाही, असंही राऊत म्हणाले आहेत. ते 'एबीपी माझा' या वृत्त वाहिनीशी बोलत होते. 

कृषी कायद्यांना स्थगिती द्या, समिती नेमा; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला...

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याच्या तयारीत आहे.या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आरोप करणाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही लोक अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करत सुटले आहेत, काहीही कागदं फडकावली तरी त्यातून काही सिद्ध होणार नाही. हिंमत असेल तर आरोप सिद्ध करुन दाखवा, नाहीतर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही हे मी आधीच सांगितलं आहे, असा इशारा राऊतांनी दिला आहे.  

राजकारण, समाजकारण, पत्रकारितेत अनेक वर्ष काम केली, आम्ही खूप काळजीपूर्वक काम केलं. तुमच्यासारख्या फडतूस लोकांनी आमच्यावरती आरोप करत बसावे यासाठी आम्ही राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता केली नाही, अशा बोचऱ्या शब्दांत राऊतांनी सुनावलं आहे. मी कायद्याची भाषा बोलत नसलो, तरी मला आणि पक्षाला प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. जे कायद्याच्या पलीकडे जाऊन बोलत आहेत, त्यांच्याकडे कायद्याची कोणती चौकट आहे? जे कोणी माकडं उड्या मारत आहेत, त्या व्यक्तीशी आमचा काही संबंध नसल्याचं पक्षानं जाहीर करावं असं राऊत म्हणाले. 

अहो, पंढरपुरातील गाढवांचं नशीबच पालटलं ! जाणार थंड हवेचे ठिकाण असलेल्या ऊटीला 

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने चालवलेल्या आरोपांमुळे ठाकरे कुटुंबाच्या प्रतिमेला अकारण तडा बसतो आहे. किरीट सोमय्या शांत होणार नाहीत हे गृहीत धरत आता त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा लावण्याची चाचपणी शिवसेनेने सुरु केली आहे. कोणतीही बेलगाम विधाने करता आहात, ती सिध्द करा अन्यथा माफी मागा असा दावा ठोकण्याचा शिवसेना नेत्यांचा विचार आहे.

किरीट सोमय्या यांनी अलिबाग येथील रश्मी उध्दव ठाकरे यांच्या घराबाबत जे आरोप केले आहेत, त्यात तथ्य नाही. ते आयकर विवरणासारख्या काही महत्वाच्या कागदपत्रात नमूद केले असल्याचेही सांगण्यात येते आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT