Sanjay Raut
Sanjay Raut  ANI
देश

काँग्रेसशिवाय विरोधी पक्षांची आघाडी अशक्य : संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पुढील लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच काँग्रेसशिवाय विरोधी पक्षांची आघाडी शक्य नाही. विरोधकांचा चेहरा कोण असेल यावर चर्चा होऊ शकते, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv sena MP Sanjay Raut) यांनी व्यक्त केले आहे. खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांची भेट घेतली त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

गेल्याच आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी बॅनर्जींनी यूपीए आहे कुठे असा सवाल करत काँग्रेसला डिवचले होते. त्यावर काँग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी होऊ शकत नाही. दोन-तीन आघाड्या झाल्या, तर त्या पर्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे विरोधकांची एकच आघाडी असायला हवी, असे राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली. विरोधकांच्या आघाडीसाठी (Opposition party) राहुल यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मी त्यांना केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विरोधकांनी एकत्रित यावे यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे, असेदेखील राहुल गांधी यांना सांगितल्याचे राऊत म्हणाले.

शिवसेना काँग्रेसप्रणित यूपीएचा (UPA) भाग होणार का, असा सवाल पत्रकारांनी राऊत यांना विचारला असता ते म्हणाले की, त्यावर मी आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेईन आणि त्यानंतर याविषयी बोलेन, असे राऊत यांनी यावेळी सांगितले. तृणमूल काँग्रेस (TMC) आणि काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार का? यावर राऊत म्हणाले की, यासाठी शरद पवार (Sharad Pawar) पुरेसे आहेत, मजबूत आहेत, मोठे नेते आहेत. प्रियंका गांधी यांची मी उद्या भेट घेणार असल्याचेही यावेळी संजय राऊत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT