Crime sakal
देश

Crime News: कौटुंबिक वादातून सहा जणांचा खून

कौटुंबिक एकाच कुटुंबातील सहा जणांचे हत्याकांड घडवून आणल्याची धक्कादायक घटना

सकाळ डिजिटल टीम

कौटुंबिक एकाच कुटुंबातील सहा जणांचे हत्याकांड घडवून आणल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यात उघडकीस आली. मृतांत तीन महिलांचा समावेश आहे. तसेच अन्य तीन जण जखमी झाले. ही घटना आज सकाळी मोरेनापासून ५० ते ६० किलोमीटर अंतरावरील लेपा भिडोसा गावात घडली. याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

गोळीबारात तीन जण जागीच ठार झाले तर तीन जणांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेले असता तेथे मृत्यू झाला. अन्य जखमींवर उपचार सुरू असल्याचे पोलिस महासंचालक (चंबळ क्षेत्र) एस.सक्सेना यांनी सांगितले. या गोळीबारातील आरोपींची ओळख पटली असून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पीडितांच्या नातेवाइकांनी कुटुंबीयांतील सदस्यांनीच हत्याकांड घडवून आणल्याचा आरोप केला आहे. मुरेनाच्या हत्याकांडाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात हल्लेखोर हे महिला आणि पुरुषांना काठीने मारहाण करताना दिसतात. यावेळी एक युवक येतो आणि नऊ जणांना गोळ्या घालतो.

नेमका वाद काय?

लेपा गावात गजेंद्र सिंह तोमर व धीर सिंह तोमर यांच्यात जमिनीवरून वाद सुरू आहे. गजेंद्र सिंह यांच्या कुटुंबीयांवर धीरसिंह यांच्या कुटुंबातील दोघांना मारल्याचा आरोप आहे. याप्रकरणी खटला सुरू आहे. गजेंद्र सिंह यांनी सहा लाखांची भरपाई दिली आहे. परंतु पैसे घेऊनही धीरसिंह यांनी खटला मागे घेतला नाही.

या भितीने गजेंद्र सिंहाचे कुटुंबीय मुरैना येथे राहात होते. गजेंद्र सिंह तोमर यांचा मुलगा राकेश सिंह तोमर यांनी सांगितले, की सकाळी आम्ही मुरेनाहून गावी आले. तेव्हा धीरसिंहाचे कुटुंब गच्चीवर लपून बसले होते. आमची गाडी थांबताच त्यांनी काठ्या आणि बंदुकीने आमच्यावर हल्ला केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT