corona death e sakal
देश

काळाचा घाला! कोरोनामुळे जुळ्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू

कोरोनामुळे अनेक जणांनी त्यांच्या प्रियजनांना गमावलं आहे.

शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून देशात सुरु असलेलं कोरोनाचा (covid) तांडव अद्यापही सुरु आहे. या विषाणूमुळे अनेक जणांनी त्यांच्या प्रियजनांना गमावलं आहे. यामध्येच सोशल मीडियावर सध्या दोन जुळ्या भावंडांच्या निधनाची चर्चा रंगली आहे. ऐन तारुण्यात असलेल्या दोन जुळ्या भावंडांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (shocking news twins born together died together from covid)

'टाइम्स ऑफ इंडिया'नुसार, कोरोनामुळे Joefred Varghese Gregory आणि Ralfred George Gregory या दोन जुळ्या भावंडांचा मृत्यू झाला आहे. कामानिमित्त हे दोन्ही भावंडं हैदराबाद येथे राहत होते. त्याच काळात या दोघांनाही एकाच वेळी कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यूदेखील झाला. Joefred Varghese Gregory आणि Ralfred George Gregory यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या आई-वडिलांना प्रचंड धक्का बसला आहे.

"लहानपणापासून या दोघांच्या सवयी सारख्या होत्या. त्यातच जर एकाला काही झालं तर सेम तसंच दुसऱ्यालादेखील व्हायचं. त्यामुळे एकाला ताप आल्यावर दुसऱ्यालादेखील तो यायचा. माझ्या मुलांच्या मृत्यूपुर्वी अनेक इच्छा होत्या. त्यांनी कामानिमित्त कोरिया किंवा जर्मनीला जायचं होतं. पण माहित नाही देवाने त्यांना कोणत्या गोष्टीची शिक्षा दिली. आता आमचा Nelfred हा तिसरा मुलगाच आमच्यासोबत आहे", असं या मुलांच्या वडिलांनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात, "मला मुलांच्या मृत्यूची बातमी समजली आणि त्यावेळी जोफ्रेडचा मृत्यू झालाय आणि आता Ralfred सुद्धा परत येणार नाही असं मी माझ्या पत्नीला सांगितलं.१३ आणि १४ मे काही तासांच्या अंतरानेच या दोघांचा मृत्यू झाला. आमच्या दोन्ही मुलांनी माझ्यासाठी खूप प्लॅन्स केले होते. आमचं पुढील आयुष्य सुखात जावं यासाठी ते कायम प्रयत्न करायचे."

दरम्यान, Joefred आणि Ralfred यांच्यावर प्रथम घरीच प्राथमिक उपचार करण्यात येत होते. मात्र, हळूहळू ऑक्सिजनची पातळी खालावल्यामुळे त्यांना १ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोना टेस्ट केल्यावर दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. तर, आयटीपीसीआर टेस्ट मात्र निगेटिव्ह आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

YouTube Upload Issue: जगभरातील क्रिएटर्स हैराण! यूट्यूबवर व्हिडिओ अपलोडिंगमध्ये अडचण, नेमकं कारण काय?

Air India: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! २९ आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणांत मोठी कपात; एअर इंडियाचा मोठा निर्णय, जाणून घ्या यादी...

Fuel Crisis: मोदी बोलले, एकनाथ शिंदेंनी अस्तित्वात आणले, सरकारी ताफ्यातील वाहनं कमी करून दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरले

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

SCROLL FOR NEXT