shopkeeper with his sons beat up dalit girl after she touched him by mistake in rajasthan
shopkeeper with his sons beat up dalit girl after she touched him by mistake in rajasthan  esakal
देश

दुकानदाराकडून दलित मुलीला बेदम मारहाण, कारण ऐकून होईल संताप

सकाळ डिजिटल टीम

राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यात दलित मुलीला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण बारी उपविभागातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाकसौदा या गावातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दलित कुटुंबातील एक मुलगी गावातील दुकानात वस्तू घेण्यासाठी गेली होती. यावेळी तीचा चुकून दुकानदाराच्या हाताला स्पर्श झाल्याने दुकानदाराने तीला मारहाण केल्याचे समोर आले आहे. आरोपी दुकनदाराने त्याच्या मुलांसोबत आधी दलित मुलीला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर पीडितेची मोठी बहीण तिला वाचवण्यासाठी आली तेव्हा तिलाही मारहाण केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही बहिणींना बारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

पीडित दलित कुटुंबप्रमुखाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी बारी पोलिस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांनी त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. ही घटना 8 मे रोजी घडली असून अद्यापही कुटुंबाकडून न्यायासाठी एसपींकडे मागणी करण्यात येत आहे.

तसेच पिडीत परिवाराने त्यांच्यावर आरोपींकडून गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा दावा केला आहे. तसे नाही केल्यास त्यांना गाव सोडण्यास भाग पाडले जाईल असे त्यांचे म्हणण आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून आयपीसी कलम 323, 341, 354, 504, 506. 379 आणि हरिजन कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केल्याची माहिती बारी पोलिस स्टेशनचे हेड कॉंन्स्टेबल जसराज यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT