Crime Esakal
देश

Delhi Crime: श्रद्धा हत्येसारखी दुसरी घटना : नवऱ्याची हत्या करून तुकडे फ्रीजमध्ये ठेवले, महिलेला अटक

पतीच्या हत्येप्रकरणी एका महिलेसह तिच्या मुलाला अटक

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीमध्येच काही दिवसांपूर्वी श्रद्धा वालेकर या मुंबईतल्या तरुणीच्या खून प्रकरणाने देशभरात खळबळ माजवली. तिचाच प्रियकर आफताब पुनावाला याने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते जंगलात टाकले आहेत. ही घटना ताजी असतानाच दिल्लीमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पूर्व दिल्लीत सापडलेल्या मानवी शरीराच्या अवयवांचे गूढ उकलले आहे. दिल्लीतील पांडव नगरमध्ये राहणाऱ्या तरुणाचा मृतदेह घरात कापून फ्रीझमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मारेकरी दररोज पांडव नगर आणि पूर्व दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात मृतदेहाचे तुकडे फेकायचे. ही सर्व घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आई आणि मुलाने मिळून ही हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांनी मृतदेहाचे तुकडे करून ते घरातील फ्रीजमध्ये लपवून ठेवले आणि नंतर पांडवनगर परिसरात फेकून दिले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अमर उजाला या हिंदी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या हत्येचे आरोपी आई पूनम आणि मुलगा दीपक असून ज्याची हत्या करण्यात आली तो महिलेचा नवरा होता. अंजन दास यांची हत्या अवैध संबंधातून झाल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT