Shraddha murder case accused Aftab Poonawalla van attacked with sword in Delhi Video  
देश

Delhi Crime News : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबवर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न, घटनेचा Video आला समोर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: देशाला हदरवून सोडणाऱ्या दिल्ली हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याच्यावर तलवारीने हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पॉलिग्राफीनंतर तुरुंगात परत घेऊन जात असताना त्याच्या गाडीवर हा हल्ला झाला आहे.

श्रद्धा हत्येतील आरोपी आफताब पूनावाला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर दिल्लीतील एफएसएल कार्यालयाबाहेर तलवारी घेऊन आलेल्या लोकांनी हल्ला केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे. आफताबला पोलिसांच्या गाडीमध्ये बसवून जेलमध्ये नेण्यात येत होतं त्यावेळी हा प्रकार घडला. दरम्यान हल्ला केलेले कार्यकर्ते हे हिंदू सेनेचे असल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा - काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

एफएसएल लॅबमधून जेलच्या दिशेने जात असताना आफताब पोलिसांच्या ज्या गाडीत बसला होता त्यावर चढण्याचा प्रयत्न देखील यावेळी झाला. हे हल्लेखोर कोण आहेत याबद्दल अजून नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार ते हिंदू सेनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या हल्ल्यात आफताब पोलिसांच्या सुरक्षेत असल्याने बचावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT