Shraddha Murder Case
Shraddha Murder Case esakal
देश

Shraddha Murder Case : इंस्टाग्रामवर फूड ब्लॉगर होता आफताब, असं करत होता स्वतःला प्रमोट

सकाळ डिजिटल टीम

Shraddha Murder Case Food Blogger Aftab : दिल्लीत २६ वर्षिय श्रध्दाच्या २८ वर्षिय बॉयफ्रेंड आफताबने केलेल्या निर्घूण हत्येने संपूर्ण देशाला हादरवलं आहे. ही घटना समोर येताच इंटरनेट युझर्स सोशल मीडियावर आरोपी आफताबचं प्रोफाइल धुंडाळत आहेत. क्रुरतेची हद्द पार करणारा आफताब इंस्टाग्रामवर फूड ब्लॉगर होता. तर फेसबूवर तो स्वतःला पर्यावरणवादी असल्याचं दाखवत होता.

तो इंस्टाग्रामवर आफताब अमीन पूनावाला 'हंगर छोक्रो_एस्कॅप्ड्स' (hungrychokro_escapades) नावाने फूड ब्लॉग चालवत होता. त्याचे २८ हजार ५०० फॉलोवर्स होते. त्याने भारतीय आणि चीनी पदार्थांचे आकर्षक फोटोज शेअर केले आहेत. तर काही फोटोत घरात बनवलेल्या डिशेस विषयी सांगितलं आहे.

हे ही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

त्याच्या प्रोफाइलमध्ये त्याने स्वतःला फोटोग्राफर, फूड अँड बेव्हरेज कंसल्टंट आणि फूड फोटोग्राफर म्हटलं आहे. फेसबूक अकाउंट आता इनअ‍ॅक्टीव्ह असून शेवटची पोस्ट २०१९ मध्ये पोस्ट केलं होतं. त्याचं प्रोफाइल चेक केल्यावर त्यात अनेक रेस्टॉरंटला टॅग केलेलं होतं, ज्यात तो गेला असेल. फेसबुक प्रोफाइलनुसार तो वसईच्या सेंट फ्रांसिस हायस्कूलचा विद्यार्थि होता. तर अलअस रहेजा कॉलेजमधून बीएमएसची डिग्री घेतली होती.

LGBTQIA+ चा समर्थक होता

एवढच नाही तर तो स्वतःला LGBTQIA+ कम्युनिटीचा समर्थक, पर्यावरणवादी आणि उदारमतवादी म्हणून दाखवत होता. त्याने मुंबईच्या आरे जंगल वाचवा मोहिमेसाठी पिटीशनवर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सही मागितली होती.

तर एकदा एका दिवळीत लहान मुलीचा एक बोर्ड घेतलेला फोटो शेअर केला होता ज्यात यंदाच्या दिवाळीला फटाक्यांऐवजी अहंकार जाळा असं लिहीलेलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT