Shraddha Murder Case esakal
देश

Shraddha Murder Case: आफताबचा मोठा खुलासा, 'मृतदेह कापून थकल्यावर जेवण मागवलं, बिअर प्यायली अन्…'

सकाळ डिजिटल टीम

Shraddha Murder Case दिल्लीतील हत्या प्रकरणावरुन संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिला आहे. श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालाने चौकशीदरम्यान पोलिसांकडे अनेक खुलासे केले आहेत. या प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. आफताबने दिलेल्या माहितीनुसार श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्यांने काय केलं याबद्दल माहिती समोर आली आहे.

दरम्यान श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने बाहेरून एक करवत आणली आणि बाथरूममध्ये श्रद्धाचा मृतदेह कापायला सुरुवात केली. काही वेळाने तो थकला तेव्हा त्याने बाहेरून जेवण मागवले. त्यांनी मृतदेहासमोर बसून जेवन केले. यादरम्यान त्याने बिअरही प्यायली आणि त्यानंतर वेब सीरिज पाहिली असा धक्कादायक खुलासा केला आहे.

हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

गुरुवारी साकेत न्यायालयाने आफताबच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली. हजर होण्यापूर्वी वकिलांनी न्यायालयाबाहेर गोंधळ घातला. वकिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी वकिलांनी केली आहे. वकिलांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. यानंतर आफताबची सुनावणी फिजीकल सुनावणीऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली.

आरोपी आफताब पूनावाला याने गुरुवारी केलेल्या चौकशीत कबूल केले की, त्याने पाच महिन्यांहून अधिक काळ श्रद्धाच्या डोक्यासह तिच्या शरीराचे अवयव रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजवरूनही याची पुष्टी झाली आहे.

आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने श्रद्धाच्या शरीराचे फक्त 16 तुकडे केले होते. यादरम्यान तो पूर्वीप्रमाणेच वागत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर दु:ख किंवा पश्चातापाचे कोणतेही भाव दिसत नाहीत.

हत्येच्या दुसऱ्या दिवशी त्याने श्रद्धाचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला होता. दिवसभर मृतदेह बाथरूममध्ये पडून होता. यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे पॉलिथिनमध्ये बांधून जंगलात फेकून दिल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले आहे.

श्रद्धाचे डोके, धड, पायाची बोटे फ्रीजमध्ये पॉलिथिनमध्ये पॅक करून ठेवली होती. मृतदेहाचे हे तुकडे फेकण्याची संधी मिळाली नाही, असे आरोपीचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तामिळनाडुत सत्तास्थापनेसाठी हालचाली, TVKसोबत काँग्रेसचं 'डील'; खातेवाटप फॉर्म्युला ठरला?

Mumbai: महारेराच्या रडारवर ४,६४४ प्रकल्प, मुंबईसह एमएमआरमधील विकसकांना नोटीस

Mumbai Local: डहाणू-विरार लोकल प्रवास आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर पहिली १५ डब्यांची ट्रेन सुरू; प्रवाशांना दिलासा

बाऊन्सरपेक्षा 'तिला' घाबरतो! भर कार्यक्रमात चेन्नईच्या कर्णधाराने दिली कबुली; पाहा व्हिडिओ...

Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना ! ९ वर्षांच्या मुलीची वडिलांकडून निर्घृणपणे हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी घर पेटवले

SCROLL FOR NEXT