Shraddha Murder Case esakal
देश

Shraddha Murder Case : श्रध्दासारखी बॉलिवूडमधल्या 'या' अभिनेत्रींची झाली होती फसवणूक, त्यांचेही...

बहुचर्चिच श्रध्दा वालावलकर हत्याकांडाने सगळ्यांचीच झोप उडवली. पण अशा घटना नवीन नाही. आधीही काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या अशा हत्या झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Shraddha Murder Case : बहुचर्चिच श्रध्दा वालावलकर हत्याकांडाने सगळ्यांचीच झोप उडवली. रोज नव्याने होणारे खुलासे अंगावर काटा आणणारे आहेत. पण अशा घटना नवीन नाही. आधीही काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या अशा हत्या झाल्या आहेत. यापैकी एका अभिनेत्रीचं प्रेत श्रध्दा सारखंच तुकडे तुकडे करून फेकलं होतं.

Shashirekha

शशिरेखा

प्रसिध्द तमिळ टीव्ही अभिनेत्री होती. पतीनेच तिची हत्या केली. शशिरेखाचा पती रमेश शंकर दुसऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात होता. त्यांच्या अफेयरमध्ये शशिरेखा अडचण ठरत होती. म्हणून या भयंकर हत्याकांडाचं शडयंत्र रचलं गेलं. तिचं शीर पतीनेच धडापासून वेगळं केलं. ही हत्या केल्यानंतर पती आणि त्याच्या प्रेयसीने हे प्रेत दोन दिवस बाथरूममध्ये कोंडून ठेवलं आणि मग संधी बघून विल्हेवाट लावली.

Priya Rajvansh

प्रिया राजवंश

अभिनेत्री प्रिया राजवंश हिचा जीवनप्रवास सिनेमाच्या कथेसारखं होतं. तिच्या करिअरची सुरूवात जेवढी चमकदार होती, तेवढाच तिचा अंत अंगावर काटा आणणारा होता. चेतन आनंदच्या दोन्ही मुलांनी प्रॉपर्टीसाठी तिची हत्या करवली होती. पोस्टमॉर्टममधून गळा दाबून तिची हत्या झाल्याचं समोर आलं होतं.

Laila Khan

लैला खान

अभिनेत्री लैला खानच्या हत्येने सगळेत भांबावले होते. तिची आई सेलिना पटेलने तीन लग्न केले होते. तिच्या आईकडे मुंबईत कोट्यावधीची संपत्ती होती. एक दिवस लैला अचानक गायब झाली. नंतर समोर आलं की, लैलाच्या आईच्या तिसऱ्या नवऱ्याने पैशांसाठी संपूर्ण कुटुंबाची निर्घूण हत्या केली. हत्येच्या दीड वर्षानंतर हे सर्व प्रेतं त्यांच्या फार्महाऊसमध्ये मिळाले.

Minakshi Thapar

मीनाक्षी थापर

सिने अभिनेत्री मीनाक्षी थापरच्या मित्रानेच तिला किडनॅप करून तिचं शीर धडापासून वेगळं केलं. मीनाक्षीला अभिनेता अमित जायसवाल आणि त्याची प्रेयसी प्रिती सुरीनने पहिले किडनॅप केलं. खंडणीची मागणी केली. पण खंडणी तर मिळाली नाही आणि पोलीस मागे लागले. म्हणून अमित आणि प्रिती यांनी मीनाक्षीला मारून तिचे तुकडे तुकडे केले. मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांना मीनाक्षीच्या प्रेताचा खालचा भाग अलाहबादच्या एका घराच्या पाण्याच्या टाकीच मिळाला. तर शीर लखनौ-अलाहबाद बॉर्डरवरच्या जंगलात सापडलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT