Shraddha Walker Case esakal
देश

Shraddha Walker Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी उच्‍च न्‍यायालयाचा मोठा निर्णय; 'आता वृत्तवाहिन्‍यांना कोणतीही माहिती..'

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आज (बुधवार) दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयानं (Delhi High Court) मोठा निर्णय दिला.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या वर्षी 18 मे रोजी आफताब पूनावालानं दिल्लीच्या मेहरौली भागात त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली होती.

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आज (बुधवार) दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयानं (Delhi High Court) मोठा निर्णय दिला. या प्रकरणी दाखल आरोपपत्रातील मजकूर दाखवण्‍यास किंवा त्‍याची माहिती देण्‍यास सर्व वृत्तवाहिन्‍यांना न्‍यायालयानं मनाई केलीये.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी दिल्‍ली पोलिसांनी (Delhi Police) दाखल केलेल्‍या आरोपपत्रातील गोपनीय माहिती प्रकाशित करणं, छापणं आणि प्रसारित करणं, तसंच या प्रकरणाच्या तपासादरम्यान गोळा केलेली इतर सामग्री प्रसारित करण्यापासून प्रसिध्दी माध्‍यमांना प्रतिबंधित करावी, अशी मागणी करणारी याचिका दिल्‍ली पोलिसांनी दाखल केली होती.

यावर न्‍यायमूर्ती रजनीश भटनागर यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सर्व वृत्तवाहिनींनी श्रद्धा वालकर खून प्रकरणाचे आरोपपत्रातील मजकूर प्रदर्शित करु नये किंवा दाखवू नये, असे निर्देश न्‍यायमूर्ती रजनीश भटनागर यांनी केंद्र सरकारला दिले आहेत.

गेल्या वर्षी 18 मे रोजी आफताब पूनावालानं दिल्लीच्या मेहरौली भागात त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली होती. त्यानं श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे करुन फ्रीजमध्ये तीन आठवडे ठेवले आणि नंतर दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांनी 24 जानेवारी रोजी 6,629 पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT