Shraddha Walker Murder Case esakal
देश

Shraddha Murder Case : श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबवर तलवारीनं हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांचा हवेत गोळीबार

'आफताबला दोन मिनिटे पोलीस व्हॅन बाहेर काढा. आम्ही त्याला मारून टाकू.'

सकाळ डिजिटल टीम

'आफताबला दोन मिनिटे पोलीस व्हॅन बाहेर काढा. आम्ही त्याला मारून टाकू.'

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालावर (Aftab Poonawalla) दिल्ली इथं तलवारीनं हत्या करण्याचा प्रयत्न झाला. पॉलिग्राफ चाचणीनंतर (Polygraph Test) आफताबला पोलीस व्हॅनमधून नेलं जात होतं. त्यावेळी किमान दोन जणांनी नंग्या तलवारी घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिसांनी तात्काळ मध्ये येत व्हॅनचं दार लावून घेतलं आणि त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांचा प्रतिक्रार केला. हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हल्लेखोरांनी आपण हिंदूसेना नावाच्या संघटनेचे सदस्य आहोत, असा दावा केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

आफताबला काल पॉलिग्राफ चाचणीसाठी दिल्लीतील रोहिणी भागातील ‘एफएसएल’ कार्यालयात आणण्यात आलं. चाचणीनंतर सायंकाळी पोलीस आफताबला पुन्हा तिहार कारागृहात घेऊन जाण्यासाठी निघाले असता, हातात तलवारी घेऊन आलेल्या तरुणांनी आफताबवर तलवारीनं वार करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा तरुणांना रोखण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्यानं बंदूक काढत हवेत गोळी झाडण्याचा इशारा दिला.

तरीही तरुणांनी पोलीस व्हॅनवर वार करणं सुरूच ठेवलं. अखेर चालकानं पोलीस व्हॅन पुढं नेली. आफताब हल्ल्याचा प्रयत्न करणारा तरुण हे हिंदू सेनेचे असल्याचं सांगण्यात येतं. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आफताबला दोन मिनिटे पोलीस व्हॅन बाहेर काढा. आम्ही त्याला मारून टाकू. तलवारीनं हल्लाच काय आम्ही त्याला गोळ्याही घालू. माझे नाव कुलदीप ठाकूर असून हिंदू सेनेचा राजाध्यक्ष आहे, असं एका तरुणानं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Election Akhilesh Yadav: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध; भाजपला टक्कर देण्यासाठी 'हे' मुद्दे घेऊन मैदानात

Onion Rate: कांद्याचे भाव घसरले! 9 दिवसांत 1,800 रुपयांची घसरण; लासलगावमध्ये आजचा दर किती?

आनंद... ज्याचा त्याचा! ; जुन्या क्रिकेट मासिकांतील दुर्मिळ लेख, छायाचित्रे आणि दिग्गज खेळाडूंच्या आठवणी जतन करण्याचा अनोखा आनंद

INDIA PAVILION AWARD: व्हेनिस आर्ट बिएनालेमध्ये भारताचा डंका! 'बेस्ट नॅशनल पॅव्हेलियन' पुरस्कार; काय आहे खास? जाणून घ्या

IND vs NZ 2nd Test Weather Update: भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी पहाटे उठण्यापूर्वी हे नक्की वाचा... Christchurch मधून Live अपडेट्स; नेमकं काय घडणार?

SCROLL FOR NEXT