Shraddha Walker Case Delhi Police
Shraddha Walker Case Delhi Police esakal
देश

Delhi Police : श्रद्धा हत्याकांडात पोलिसांना मिळाला महत्त्वाचा सुगावा; झडतीदरम्यान सापडली तीन हाडं अन् जबडा

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांना झडतीदरम्यान कवटीच्या खालच्या भागासह आणखी 3 हाडं सापडली आहेत.

Shraddha Walker Case : दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) श्रद्धा वालकर हत्याकांडाचा तपास सुरू केलाय. आरोपी आफताबनं सांगितलेल्या ठिकाणी दिल्ली पोलिसांनी शोध मोहीमही सुरू केलीय. दरम्यान, पोलिसांना त्याच ठिकाणाहून आता कवटीचा खालचा भाग आणि जबडा मिळाला आहे.

दिल्ली पोलिसांना झडतीदरम्यान कवटीच्या खालच्या भागासह आणखी 3 हाडं सापडली आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात सापडलेला जबडा मानवाचा असल्याचं स्पष्ट होत आहे. जबडा आणि हाडं तपासासाठी पाठवण्यात आली आहेत. आफताबचं कुटुंब ज्या सोसायटीत राहत होतं, त्या सोसायटीचे सेक्रेटरी म्हणाले, आफताबचे आई-वडील 20 दिवसांपूर्वी घर सोडून कुठेतरी निघून गेले आहेत. त्यांचा मोबाईल नंबरही बंद आहे.

दिल्ली पोलिसांनी सुमारे तासभर सेक्रेटरी अब्दुल्ला यांचा जबाब नोंदवला. आफताबचे आई-वडील युनिक पार्कमध्येच राहत होते. युनिक पार्कचे सेक्रेटरी अब्दुल्ला म्हणाले, "आफताबचं कुटुंब 20 दिवसांपूर्वी माझं घर सोडून कुठेतरी निघून गेलं आहे. मात्र, ते कुठे गेले याची आम्हाला माहिती नाही."

आफताबला मिटवायचा होता श्रद्धाचा प्रत्येक पुरावा

पोलिसांच्या चौकशीत आफताबनं सांगितलं की, त्यानं आधी तिन्ही फोटोंच्या फ्रेम्स तोडल्या आणि नंतर किचनमध्ये माचीस लावून त्या जाळल्या. आफताबला श्रद्धाशी संबंधित सर्व पुरावे नष्ट करायचे होते. त्यासाठी त्यानं 23 मे रोजी घरातील श्रद्धाचं सामान एका पिशवीत भरलं होतं. आफताबच्या फ्लॅटमधूनही पोलिसांनी एक बॅग जप्त केलीय. त्यात श्रद्धाचे कपडे आणि बूट सापडलं आहे.

दिल्ली पोलिसांकडून महाराष्ट्रातील चौघांची चौकशी

त्याच वेळी दिल्ली पोलिसांच्या पथकानं शनिवारी महाराष्ट्रातील पालघरमध्ये (Maharashtra Palghar) चार लोकांचे जबाब नोंदवले. त्यांच्याकडून 27 वर्षीय श्रद्धा वालकरनं 2020 मध्ये आफताब पूनावालाच्या प्राणघातक हल्ला केल्यानंतर मदत मागितली होती. यापैकी एक मुंबईतील कॉल सेंटरचा माजी व्यवस्थापक आहे, जिथं श्रद्धा काम करायची आणि दुसरा तिचा मित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT