Mathura Police esakal
देश

Mathura Police : मशिदीत होणार हनुमान चालिसाचं पठण, हिंदू महासभेची मोठी घोषणा

'भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमीत पूजा केली नाही, तर आम्ही कुठं पूजा करणार?'

सकाळ डिजिटल टीम

'भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमीत पूजा केली नाही, तर आम्ही कुठं पूजा करणार?'

मथुरा : हिंदू महासभेनं श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेतील शाही ईदगाह इथं आज हनुमान चालिसाचं पठण करण्याची घोषणा केली. हिंदू महासभेच्या घोषणेनंतर जिल्हा प्रशासनानं जन्मभूमी परिसराची सुरक्षा वाढवलीय.

अखिल भारतीय हिंदू महासभेच्या (All India Hindu Mahasabha) एका नेत्यानं सोमवारी प्रशासनाला इशारा दिला की, 6 डिसेंबरला श्रीकृष्ण (Shri Krishna) जन्मभूमी संकुलातील शाही ईदगाह इथं हनुमान चालिसाचं (Hanuman Chalisa) पठण करू आणि ईदगाहमध्ये पठण न करु दिल्यास आत्मदहन करू, असा इशारा त्यांनी दिला.

मथुरेचे पोलीस (Mathura Police) अधीक्षक (शहर) मार्तंड प्रकाश सिंह यांनी सांगितलं की, 'हिंदू महासभा आणि संघटनांनी ईदगाह इथं हनुमान चालिसाचं पठण करण्याची घोषणा केल्यामुळं श्रीकृष्ण जन्मस्थान आणि शाही इदगाह मशिदीच्या (Shahi Idgah Mosque Mathura) आसपासच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आलीय.'

हिंदू महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश शर्मा म्हणाले, आज दुपारी अभिजीत मुहूर्तावर ईदगाहमध्ये देवाच्या जन्मस्थानी हनुमान चालिसाचं पठण करण्याची परवानगी न मिळाल्यास मी आत्मदहन करीन. भगवान श्रीकृष्णाची त्यांच्या जन्मभूमीत पूजा केली नाही, तर आम्ही कुठं करणार? असा सवाल त्यांनी प्रशासनाला केलाय. महासभेनं केलेल्या घोषणेनंतर देश-विदेशातून सनातनी धर्माचे अनुयायी मथुरेला पोहोचत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT