Matura Krishna Temple  esakal
देश

Matura Krishna Temple : ''श्रीकृष्ण मंदिराची वास्तू औरंगजेबानेच पाडली'', माहिती अधिकारात समोर आली बाब

श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात एक मोठी माहिती पुढे आलेली आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, मुघल सम्राट औरंगजेबाने मथुरेत श्रीकृष्ण मंदिराची वास्तू पाडून मशीद उभारल्याचं पुढे आलेलं आहे. आग्र्याच्या पुरातत्व विभागाने याबाबत माहिती दिली.

संतोष कानडे

मथुराः श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात एक मोठी माहिती पुढे आलेली आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, मुघल सम्राट औरंगजेबाने मथुरेत श्रीकृष्ण मंदिराची वास्तू पाडून मशीद उभारल्याचं पुढे आलेलं आहे. आग्र्याच्या पुरातत्व विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

मैनपुरीचे अजय प्रताप सिंह यांनी देशभरातील मंदिरांच्या संबंधाने माहिती मागवली होती. यामध्ये मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमीची माहिती मागवली होती. याच्या उत्तरात भारतीय पुरातत्व खात्याने ब्रिटीश साम्राज्याच्या काळात प्रकाशित करण्यात आलेल्या राजपत्राचा दाखला दिला आहे. मशिदीच्या जागेवर सुरुवातीला केशवदेव मंदिर होतं. त्या मंदिराची वास्तू पाडून मशिद बांधली गेली, असं सांगण्यात आलंय. 'आज तक'ने हे वृत्त दिले आहे.

कृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासाचे अध्यक्ष Adv. महेंद्र प्रताप यांनी सांगितलं की, ब्रिटीश सरकारच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या लोककार्य विभागाच्या इमारत आणि रस्ते सेक्शनच्या वतीने १९२० मध्ये अलाहाबादमध्ये गॅझेट प्रकाशित करण्यात आलेलं होतं. त्यात उत्तर प्रदेशातल्या वेगवेगळ्या भागातील ३९ स्मारकांची माहिती उपलब्ध आहे. या सुचीमध्ये ३७ क्रमांकावर कटरा केशवदेव भूमीवर श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख आहे. टेकडीवर पूर्वी मंदिर होतं, ते पाडून तिथे मशीद उभाल्याची नोंद त्यात आहे.

श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद काय?

औरंगजेबाने मथुरेतील मंदिर पाडून तिथे मशीद बांधली, असा हिंदूंचा दावा आहे. १६७० मध्ये मथुरेतील केशवदेवाचे मंदिर पाडण्याचा आदेश जारी केला होता. यानंतर शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली. मथुरेतील हा वाद एकूण 13.37 एकर जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित आहे.

श्री कृष्ण जन्मस्थानकडे 10.9 एकर जमिनीचा मालकी हक्क आहे. तर शाही ईदगाह मशिदीकडे अडीच एकर जमिनीचा मालकी हक्क आहे. ही मशीद हटवून जमीन श्रीकृष्ण जन्मभूमीला द्यावी, अशी मागणी हिंदूंकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT