D. K. Shivakumar
D. K. Shivakumar esakal
देश

D. K. Shivakumar: सिद्धरामय्या माझे बॉस नाहीत! उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेपूर्वी शिवकुमार गरजले

रुपेश नामदास

काँग्रेसने कर्नाटकमध्ये भाजपला खुप मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचे या राज्यात १३५ आमदार निवडणून आले आहे. तर २० तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शपथ विधीचा कार्यक्रम आहे.

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांना राज्याचे उपमुख्यमंत्री तर सिद्धरामय्या यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. 20 मे रोजी बंगळुरू येथे शपथविधी सोहळा होणार आहे. मात्र त्याआधी डीके शिवकुमार यांचे एक वक्तव्य चर्चेत आहे.

यामध्ये त्यांनी 'सिद्धरामय्या माझे बॉस नसतील, मी बॉस सिस्टममध्ये काम करत नाही' असे म्हटले आहे. डी.के शिवकुमार यांच्या या विधानाचा आणि राजकीय वृत्तीचा कर्नाटकातील पुढील सरकार, तेथील राजकारण आणि सिद्धरामय्या यांच्याशी असलेल्या संबंधांवर कसा परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

काय म्हणाले शिवकुमार

"मी 1985 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली, सलग 8 वेळा आमदार राहिलो. माझा स्वतःचा अनुभव आहे. मी एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत काम केले आहे. एस.एम.कृष्णाजींच्या सोबत काम केलं आहे. एस. बंगारप्पा यांनी जीकेजी अंतर्गत काम केले. एस बंगारप्पा हे माझे राजकीय गुरू आहेत. ते दोघेही माझे नेते होते. बाकी सगळे माझे सहकारी आहेत. सिद्धरामय्या आणि एचडी कुमारस्वामी माझे मित्र आहेत."

दिल्लीत बैठकीचे सत्र

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदावर सलग चार दिवस दिल्लीत बैठकांचं सत्र चालू अखेर गुरुवारी १८ मे ला काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत घेत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या असतील तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के शिवकुमार हे उपमुख्यमंत्री असतील. अशी घोषणा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

SCROLL FOR NEXT