Karnataka Election Esakal
देश

Karnataka Election: डीके शिवकुमार की सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? कोणाची ताकद किती जाणून घ्या

कर्नाटकात विजयानंतर काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?

अंकिता खाणे (Ankita Khane)

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत हाती आलेले कल पाहता काँग्रेसला 118 जागांवर आघाडी मिळाली आहे. यानंतर काँग्रेस आणि भाजप यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. तर देशभरात कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक निकालांची चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या कार्यालयात आणि कार्यकर्त्यांमद्धे उत्साहाचे वातावरण आहे. आतापर्यंत आलेला कल कायम राहीला तर काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता आहे.

अशातच काँग्रेसचे सरकार आले तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार हे दोघेही आहेत, असं पक्षातील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. काँग्रेसच्या एका आमदाराचं म्हणणं आहे की, सिद्धरामय्या हे जास्त अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना सरकार चालवण्याचा अनुभव आहे. तर डीकेएस हे आव्हान देणारे नेते आहेत आणि सोनिया गांधींचे ते ऐकतात. मात्र, अंतिम निर्णय 'हायकमांड'चाच असणार आहे.

कोण आहेत सिद्धरामय्या?

१) सिद्धरामय्या यांनी 2013 ते 2018 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून पद भूषवलं आहे. आज निवडणूक निकालानंतर काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला तर सिद्धरामय्या हे काँग्रेसची पहिली पसंती असू शकतात.

२) माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात सामाजिक-आर्थिक सुधारणा योजनेतून अनेक महत्त्वाचे बदल घडवून आणलेत. गरिबांसाठी अनेक योजना सुरु केल्या.

३) सात किलो तांदूळ देणारी अन्न-भाग्य योजना, सर्व शालेय विद्यार्थ्यांना 150 ग्रॅम दूध देणारी क्षीर-भाग्य योजना आणि इंदिरा कॅन्टीनमुळे कर्नाटक राज्यातील गरिब जनतेला मोठा दिलासा मिळाला.

४) सिद्धरामय्या यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्यातील उपासमार, शिक्षण, स्त्री आणि बालमृत्यू यांच्याशी लढण्यासाठी योजना आणल्या होत्या, ज्यामुळे राज्यातील लाखो गरीब कुटुंबांना दिलासा मिळाला.

५) सिद्धरामय्या यांच्या काळात मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप, महिलांसाठी पंचायत अनिवार्य करणे आणि गर्भधारणेनंतर 16 महिन्यांपर्यंत महिलांना पौष्टिक आहार उपलब्ध करुन देऊन महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या योजना आणल्या.

६) सिद्धरामय्या यांच्या काळात काही निर्णय घेतले ज्यामुळे लिंगायत, विशेषतः हिंदू मतदारांमध्ये त्याची लोकप्रियता कमी झाली होती.

कोण आहेत डीके शिवकुमार?

१) डीके शिवकुमार हे कनकापुरा मतदारसंघातून सलग 8 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत.

२) शिवकुमार अनेक वर्षांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं स्वप्न आहे.

३) 2018 च्या निवडणुकीतही त्यांना मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Expressway Toll System : आता ‘एक्स्प्रेसवे’वर टोल भरण्यासाठी गाडी थांबवून वाट पाहण्याची गरज नसणार!

Ichalkaranji Election : इचलकरंजी महापालिका निवडणुकीत उमेदवारीचा तिढा कायम; भाजप-महाविकास आघाडीत इच्छुकांची धावपळ आणि राजकीय अस्वस्थता वाढली

Jalgaon Municipal Election : आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कडक नियम; उमेदवारांना खर्च मर्यादेचा इशारा

BMC Election: आचारसंहितेवरून तंबी भंग केल्यास ४ तासांत कारवाई, महापालिकेचा इशारा

Chenpi : संत्र्याची साल विकून लोक बनतायत लखपती; 1 किलोची किंमत वाचून व्हाल शॉक, तुम्ही कसा करू हा शकता बिझनेस? पाहा

SCROLL FOR NEXT