Siddhu Moosewala Sakal
देश

मुसेवाला हत्या प्रकरण: तुरुंगातल्या आरोपीला कैद्यांकडून बेदम मारहाण; गंभीर जखमी

त्याला पोलिसांनी मुसेवालाच्या मारेकऱ्यांना हत्यारं पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

सकाळ डिजिटल टीम

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी ताब्यात असलेल्या आरोपीला कारागृहातच मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत हा आरोपी गंभीर जखमी झाला आहे. इतर कैद्यांनीच त्याला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. (Siddhu Moosewala Murder Case)

लुधियाना मध्यवर्ती कारागृहात आरोपी सतबीर होता. तिथे त्याच्यासोबत असणाऱ्या कैद्यांनी त्याला मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारांसाठी तात्काळ रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. सतबीर सिंगला लुधियाना पोलिसांनी मुसेवालाच्या मारेकऱ्यांना हत्यारं पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतबीरवर हल्ला केलेल्या कैद्यांचा त्याच्यावर राग होता. सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडात सहभाग असल्याने हे कैदी त्याच्यावर संतापले होते. त्यामुळे त्यांनी सतबीरवर हल्ला केला. २९ मे रोजी दिवसाढवळ्या प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vegetable Rate Hike : पावसाचे आगमन लांबले; भाजीपाला महागला! आवक ४० टक्क्यांनी घटली; मेथी, भेंडी, पालक, वांगीही तेजीत

Bullet Train: भारतच पुढची बुलेट ट्रेन उभारणार! मुंबईहून पुण्यात अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचणार; कामाला सुरुवात कधी होणार?

'तो फोनवर घाणेरडं बोलत होता' अमृता खानविलकरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली...'निनावी नंबरवरून कॉल आला अन्...'

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमध्ये काही भागात पावसाचे आगमन

Amethi Gulgula : केकच्या युगातही कायम आहे अमेठीच्या 'गुलगुला'ची क्रेझ! पाहा साध्या गव्हाच्या पिठापासून कशी बनते ही पारंपरिक मिठाई

SCROLL FOR NEXT