punjabi singer sidhu moose wala murder case update  Sakal
देश

सिद्धू मुसेवाला हत्याकांडात मोठा खुलासा, हत्येपूर्वी बुलेटप्रूफ वाहनाची रेकी

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात मोठा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांनुसार पंजाब पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासात पुढे आले, की मुसेवाला यांच्या हत्येपूर्वी त्यांच्या बुलेटप्रूफ गाडीचीही रेकी करण्यात आली होती. बिश्नोई आणि गोल्डी बरारच्या शुटर्सने जालंधरमध्ये जाऊन सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) यांच्या गाडीचे काच किती एमएमचे आहे ही माहिती मिळवली होती. वास्तविक बुलेटप्रूफ गाडी जालंधरमध्ये बनवली जाते. मुसेवाला यांची गाडीही तेथेच बनवली गेली होती. हत्येपूर्वी पूर्ण नियोजन आखण्यात आले होते. ही बाब दिल्ली पोलिसांच्या तपासातही समोर आली आहे. (Sidhu Moose Wala Case Bulletproof Vehicle Was Reckoned Before The Murder)

तसेच पंजाब (Punjab) पोलिसांनीही एसआयटीच्या सूत्रांनी हिच गोष्ट सांगितली. हल्लेखोर जानेवारीत सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या करण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना मुसेवाला यांच्याबरोबर ८ सुरक्षारक्षक दिसले होते आणि त्यांच्या सर्वांजवळ एके-४७ बंदुक होते. त्यामुळे हल्लेखोरांनी आपले नियोजन बदलले, असे तपासात पूर्वीच स्पष्ट झाले आहे.

पूर्वी हत्येचे नियोजन

मुसेवाला कोणत्या बुलेटप्रूफ गाडीत जातो. गाडी कुठे बनवली गेली. त्यांच्याबरोबर कोण-कोण असतात? त्यांच्याजवळ कोणते हत्यार आहेत. सूत्रांनुसार यासाठीच बिश्नोई आणि गोल्डी बरारने आपल्या गुंडांना एन-९४ सारख्या अत्याधुनिक हत्यार दिले. सिद्धू मुसेवाला बुलेटप्रूफ गाडीत असला तरी निशाणा चुकू नये. यासाठी एन-९४ दिले गेले. बिश्नोई आता सात दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT