Sidhu Moose Wala murder shooter arrested, Weapons and ammunition seized Sidhu Moose Wala murder shooter arrested, Weapons and ammunition seized
देश

सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील शूटर्सला अटक; शस्त्रे व स्फोटके जप्त

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी शूटर्सच्या मॉड्यूल प्रमुखासह दोन मुख्य नेमबाजांना (शुटर्स) अटक (arrested) केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त केली आहेत. (Sidhu Moose Wala murder shooter arrested, Weapons and ammunition seized)

मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेले दोन्ही आरोपींनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार केला होता. ते लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहोत. त्यांचा गुन्हेगारी इतिहास असल्याचे सांगण्यात येत आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची पंजाबच्या मानसा जिल्ह्यात २९ मे रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हल्लेखोरांचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा आरोप आहे. मुसेवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. १४ जून रोजी पंजाब पोलिसांनी लॉरेन्सला अटक केली आणि ट्रान्झिट रिमांडवर पंजाबला नेले.

पंजाब (Punjab) पोलिसांनी दिल्लीच्या पटियाला हाउस न्यायालयात युक्तिवाद केला होता की त्यांच्या तपासादरम्यान असे आढळून आले आहे की सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील लॉरेन्स बिश्नोई हा मुख्य सूत्रधार आहे. त्याची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे.

हत्येचा कट तिहार तुरुंगाशी संबंधित

सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा कट कॅनडापासून दिल्लीच्या तिहार तुरुंगाशी जोडला गेल्याचे आतापर्यंतच्या पोलिस तपासात समोर आले आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा कट तिहार तुरुंगाशी संबंधित असण्याची शक्यता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला सुरुवातीपासूनच होती. तिहार तुरुंगातून एक फोन नंबर ट्रेस करण्यात आला आहे, असे अलीकडेच दिल्ली पोलिस अधिकाऱ्याने सांगितले होते.

ब्रार हा तुरुंगात असलेल्या गुंडाचा जवळचा साथीदार

काही दिवसांपूर्वी मोहम्मद शाहरुख या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली होती. कॅनडामध्ये राहणाऱ्या गोल्डी ब्रार या गुंडाशी बोलण्यासाठी तो मेसेजिंग ॲप वापरत होता. गोल्डी ब्रारने मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर या हत्येत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण, ब्रार हा तुरुंगात असलेल्या गुंडाचा जवळचा साथीदार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम INDIA ची एन्ट्री पक्की? फक्त 'या' ३ गोष्टी आणि इतिहास घडणार!

Viral Video: ''सगळ्यांना पप्पा आहेत.. मम्मी म्हणत होती दारु पिऊ नका, पण तुम्ही ऐकलं नाही'', वडिलांच्या फोटोसमोर चिमुकलीची नाराजी

Pune Nashik Railway Issue : पुणे–मंचर–नाशिक रेल्वे मार्ग रद्द, उत्तर पुणे जिल्ह्यात नाराजी

Water Scarcity : टंचाईमुळे नाशिक शहरात पाणीकपात; जून-जुलैमध्ये शनिवार बंद, तर ऑगस्टमध्ये दोन दिवसांआड पुरवठा

Citroen Electric Car: ईव्ही क्षेत्रात सिट्रोएनचा मोठा दाव! जास्त फीचर्ससह परवडणारी E-C3X लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंम्मत

SCROLL FOR NEXT