sidhu moosewala pet dogs refusing to eat after his death viral video  
देश

सिद्धू मुसेवालाच्या विरहात लाडक्या कुत्र्यांनी सोडलं खाणं-पिणं

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या, यादरम्यान सिध्दू मुसेवाला यांच्या कुत्र्यांचा एक ऱ्हदयविद्रावक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांचे दोन पाळीव कुत्रे झोपलेले दिसत असून त्यांनी अन्न खाण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे.

पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला हा कुत्रा प्रेमी होता, जो अनेकदा त्याच्या सोशल मीडियावर त्यांची व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असे. दरम्यान 29 मे रोजी सिद्धूच्या मृत्यूनंतर, ऑनलाइन व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, या हृदयद्रावक व्हिडिओमध्ये मुसेवाला यांचे पाळीव कुत्रे दिसत आहेत. काही इंस्टंट बॉलिवुड च्या इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओनुसार, सिद्धूचे पाळीव कुत्रे शेरा आणि बघेरा रविवारपासून अन्न खात नसल्याचे दिसत आहे

तथापि, दिवंगत गायकाच्या मृत्यूचा शोक व्यक्त करणारे केवळ त्याचे कुटुंब, सेलिब्रिटी आणि चाहते नव्हते.,तर सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सिद्धूचे पाळीव कुत्रे त्याच्या अनुपस्थितित अन्न खाण्यास नकार देत असल्याचे दिसून येत आहेत. दोन्ही कुत्रे दिवंगत गायकाच्या घराच्या एका कोपऱ्यात, एका ट्रॅक्टरशेजारी पडलेले दिसत आहेत.

दरम्यान राज्य सरकारने सुरक्षा कवच काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर रविवारी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या निधनानंतर लगेचच सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर दिवंगत गायकाला श्रद्धांजली वाहिली. हिंदी आणि पंजाबी चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी सिद्धूच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. सिद्धू यांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी मानसा जिल्ह्यातील मूसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT